Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोरोना अंतर्गत केंद्रीय पाहणी पथकांची पिंगळी येथील आरोग्य केंद्रास भेट





परभणी ➡️ कोरोना अंतर्गत केंद्रीय पाहणी पथकांने आज दुसऱ्या दिवशी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन कोवीड-19 च्या अनुषंगाने ग्रामीण भागात सुरू असलेल्या उपाययोजना व लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. या पाहणी अंती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोवीड-19 अंतर्गत सुरू असलेल्या उपाययोजनावर पथकाने समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली गंगाप्रसाद आनेराव यांनी केंद्रीय पथक सदस्य डॉ  रंजन सोलंकी व डॉ दिनेश बाबू यांचे स्वागत करून जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य संस्थांमधील अपुरे मनुष्यबळ व आपुºया सुविधा बाबत माहिती दिली व यावर पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली. भेटी दरम्यान जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी संजय कुंडीटकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एस पी देशमुख,तहसीलदार डॉ संजय बिरादार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रावजी सोनवणे, डॉ मोबीन, शिवसेनेचे गंगाप्रसाद आनेराव, रवि पतंगे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments