Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/साहित्य शिक्षण मानवाला मानव बनविण्याचे काम करत - डॉ. संतोष येरावार




नांदेड - यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सत्रारंभ कार्यक्रम संपन्न झाला.(vnsnews24, feature ) 





याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य व देगलूर महाविद्यालय, देगलूरचे हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.संतोष येरावार यांनी 'नवीन शैक्षणिक धोरण आणि हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ.कविता सोनकांबळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभ कु.सलोनी खंदारे यांच्या स्वागत गीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.संदीप पाईकराव यांनी करतांना, यशवंत महाविद्यालय आणि हिंदी विभागाचा परिचय करून देताना हिंदी विभागातर्फे आयोजित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.



कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.संतोष येरावार आपल्या व्याख्यानात म्हणाले की, साहित्य हे मानवी जीवन समृद्ध करते.वैचारिक प्रगल्भतेसोबतच मानवी मनाची जोपासना होते.  यासोबतच हिंदी भाषेत रोजगाराच्या  अनेक संधींची सविस्तर ओळख करून दिली. ते म्हणाले की, आज रोजगाराच्या संधींची कमतरता नाही; ते कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.  म्हणूनच यशाच्या शिखरावर जाताना सक्षम बनण्याचा मंत्र देणाऱ्या चांगल्या पुस्तकांच्या आणि चांगल्या मित्रांच्या सहवासात राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.  




अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्या डॉ.कविता सोनकांबळे यांनी, मानवी जीवनातील साहित्याचे महत्त्व कवितेतून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.साईनाथ शाहू यांनी केले. यावेळी हिंदी विभागाच्या  डॉ.विद्या सावते व  मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments