Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमापासून दूर राहावे - यशदा ट्रेनर डॉ.भाग्यश्री वठारे





परभणी -  आज विद्यार्थ्यांकडून शाश्वत नसलेल्या समाजमाध्यमांचा अतिवापर होत असल्याने ते आपल्या ध्येयापासून दूर जात आहेत. मोबाईलवरील विविध समाजमाध्यमांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ तसेच पैसा वाया जात आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांपासून दूर राहून यशाचे शिखर गाठावे असे प्रतिपादन पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेच्या ट्रेनर डॉ.भाग्यश्री वठारे यांनी शुक्रवार (दि.११) रोजी केले. (vnsnews24, feature ) 




येथील श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यांनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.परिमल सुतवने आदी उपस्थित होते.

 


स्पर्धा परीक्षा - तयारी, आव्हाने आणि संधी या विषयांवर मार्गदर्शन करताना डॉ.वठारे पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात विद्यार्थी तसेच पालक महाविद्यालयातील शिक्षणापेक्षा शिकवणीतील शिक्षणावर विश्वास ठेवत आहेत. परंतु स्पर्धा परीक्षेत वर्ग-१ च्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र महाविद्यालयातील शिक्षण आणि स्वयंध्ययनाच्या बळावर यश मिळविल्याचे दिसते. विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयीन जीवन परिपूर्ण करावे जेणेकरून व्यक्तिमत्त्वात परिपूर्णता येईल.आपली लढाई स्वतःशी आहे. चांगले पुस्तके वाचली तर चांगली विचार आपल्याला येतात. समाज माध्यमांचा वापर कमी करावा,जेणेकरून परिस्थितीला बळी न पडता आपण सापेक्ष बनू. युवक हा घडण्या-बिघडण्याचा वयात असतो. त्याला योग्य दिशा मिळाल्यास तो यश प्राप्त करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.





कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःला बदलून घेत आपले ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य आणि नियोजन करावे लागेल. महापुरुषांच्या कार्य आणि विचारांचे प्रेरणा घेऊन आपण यशाकडे मार्गक्रमण करू शकतो. आजच्या मोबाईलच्या विळख्यात सापडलेला तरुण यशापासून दूर जात आहे त्याला मोबाईल मधून बाहेर येणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.





या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.परिमल सुतवणे, सूत्रसंचालन डॉ.तुकाराम फिसफिसे तर आभार डॉ.विजय परसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संजय भिसे, प्रा.अमोल भराड, प्रा.प्रवीण कदम, प्रा. पल्लवी कुलकर्णी, डॉ.पी.जे.नादरे, सुरेश पेदापल्ली, साहेब येलेवाड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ तसेच वरिष्ठ विभागातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments