Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिल्ह्यात सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा डौलाने फडकवावा - सीईओ विनय मून




परभणी - देशाच्या  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता  समारंभात यावर्षी 'मेरी मिट्टी मेरा देश ' अर्थात 'माझी माती माझा देश' हा उपक्रम देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 13, 14, 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, सर्व घरावर तिरंगा झेंडा फडकवून सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे. (vnsnews24, feature ) 





जिल्हा भरात ग्रामीण भागात जवळपास 2,63,000 निवासी इमारती असून या करिता बऱ्याच नागरिकांकडे मागील वर्षी वाटप केलेले ध्वज उपलब्ध  असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार अतिरिक्त ध्वज वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत.





तसेच विविध पोस्ट ऑफिस मार्फत नागरिकांना ध्वज खरेदी देखील करता येतील अशी माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संदीप घोंसीकर यांनी दिली. ध्वज फडकवताना सर्वांनी ध्वजसंहितेचे पालन करून सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.








Post a Comment

0 Comments