Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी कलाकरांचा पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये सन्मान




परभणी ➡️ पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये परभणीचे कलाकार, लेखक, दिग्दर्शक व गीतकार  आर्यन पाटोळे आणि निर्माता, अभिनेता व कवी कार्तिक विश्वामित्रे याना बेस्ट लाइव एक्शन फिल्म हे नामांकन (अवार्ड ) मिळाले आहे. (vnsnews24, feature ) 



लेखक व दिग्दर्शक आर्यन पाटोळे ह्यांना आपली कलाकृती आपल्या मातीतून, हक्काच्या आपल्या शहरातून पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला आहे आणि त्यांनी यशस्वी वाटचाल यापुर्वीच सुरू केलेली आहे. अनेक गाणी, लघु चित्रपट आणि दिग्दर्शनातून  त्यांनी हे सिद्ध केलेले आहे. आपल्या लेखनातून आणि  दिग्दर्शनातून ते आपले स्थान कलाविश्वात बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर कार्तिक विश्वामित्रे यांनी देखील कवी, आर.जे., रॅप स्टार आणि अभिनेता म्हणून आपल करियर उंचीवर नेले आहे. 



आपल्या बळावर कला विश्वात मुशाफिरी करणार्‍या या कलावंतांनी पुण्यात झालेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये  बेस्ट लाइव ऍक्शन फिल्म हे नामांकन मिळवले आहे. परभणीतून एकमेव नामांकन ह्या लघु चित्रपटाला मिळाले आहे ही परभणीकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.







Post a Comment

0 Comments