Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ "त्या" अपघातातील गंभीर जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू





जिंतूर - जालना रोडवरील हलविरा जवळ रानडुकरामुळे घडला होता अपघात 

जिंतूर ➡️ जिंतूर - जालना रोडवरील हलवीरा पाटी  येथील गजानन महाराज मंदिरा जवळ जोगवाडा येथील रहिवाशी असलेल्या तरुणांचा दुचाकीला रानडुक्कर धडकल्याने एकजनाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 24 मे रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडली होती. यात गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा औरंगाबाद येथे दिनांक 28 मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच गावातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (vnsnews24, accident ) 




याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवाशी असलेले भास्कर रथकर व भारत रथकर दोघेजण जोगवाड्या वरून चारठाणा येथे कामानिमित्ताने दुचाकीवरून जात असताना जालना रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ अचानक रानडुकर चालत्या दुचाकीला धडकल्यामुळे दोघेजण खाली कोसळले. यावेळी दोघा नाही गंभीर मार लागला होता. घटनेची माहिती गावात मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. देविदास गरड यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान भास्कर रथकर यांचा मृत्यू झाला होता. 




यात गंभीर जखमी असलेले भारत रथकर यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान प्रकृती अधिकच खालावत चालली असल्यामुळे नातेवाईकांनी औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान मेंदूला गंभीर मार असल्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. या दरम्यान भारत रथकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली दोन मूल असा परिवार आहे. जोगवाडा गावातील दोन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 







Post a Comment

0 Comments