Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा: औरंगाबाद विभाग चे निर्विवाद वर्चस्व





लातूर ➡️ क्रिड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन लातूर वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा मध्ये दि. २७ मे रोजी भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर येथे अंतिम सामन्यात १४/१७/१९ मुले व १४/१७ मुलीच्या गटात औरंगाबाद विभागाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. (vnsnews24, feature ) 




U/14- मुले वर्षे खालील गटांत अंतिम सामना औरंगाबाद विभाग वि. अमरावती विभाग दरम्यान सरळ (२:०) सेट मध्ये पराभव करत औरंगाबाद विभाग विजयी ठरला.


अंतिम निकाल:

  1. प्रथम: औरंगाबाद विभाग : नूतन विद्यालय, सेलू जि.परभणी.
  2. व्दितीय:अमरावती विभाग: न्यू इंग्लिश हायस्कूल महाविद्यालय,राळेगांव.
  3. तृतीय:पुणे विभाग, प्राईड इंग्लिश स्कूल सन १५ आंबेगांव पूणे.




U/14- मुली गटात अंतिम सामन्यात अंतिम सामना औरंगाबाद विभाग वि.लातूर  विभाग दरम्यान अतितटीच्या लढतीत (२:१) सेट मध्ये पराभव करत औरंगाबाद विभाग विजयी ठरला.

  1. प्रथम: औरंगबाद विभाग : जि.प.शाळा आनंदगाव ता. माजलगाव.
  2. व्दितीय:लातूर विभाग : श्री. महेश माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरूर ताजबंद.
  3. तृतीय:कोल्हापूर विभाग : राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, सांगली.




U/17- मुले अंतिम सामना औरंगाबाद विभाग वि.नाशिक विभाग दरम्यान सरळ (२:०) सेट मध्ये पराभव करत  औरंगाबाद विभाग विजयी ठरला.

  1. प्रथम:-औरंगाबाद विभाग: सोमेश्वर माध्यमिक विद्यालय आरखेड,ता. पालम. 
  2. व्दितीय:नाशिक विभाग: माध्यामिक विद्यामंदीर व कनिष्ठ महाद्यिालय, एकलहरे धर्मल, नाशिक,
  3. तृतीय:-अमरावती विभाग : स्कूल ऑफ ब्रिलीयंट इंग्लिश मिडियम स्कूल राजेगांव. 




U/17 वर्षी मुली अंतिम सामना औरंगाबाद विभाग वि.कोल्हापूर विभाग दरम्यान चुरशीच्या लढतीत (२:१)सेट मध्ये पराभव करत औरंगाबाद विभाग विजयी ठरला.

  1. प्रथम:-औरंगबाद विभाग: सोमेश्वर माध्यमिक विद्यालय, आरखंड,ता.पालम. 
  2. व्दितीय: कोल्हापूर विभाग: राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली.




U/19- मुले गटात अंतिम सामना नाशिक विभाग वि.  औरंगाबाद विभाग  दरम्यान अतितटीच्या लढतीत (२:१)सेट मध्ये पराभव करत नाशिक विभाग विजयी ठरला.

  1. प्रथम:-नाशिक विभाग: माध्यमिक विद्यामंदीर व कनिष्ठ महाधिालय एकलहरे धर्मल नाशिक.
  2. व्दितीय: औरंगाबाद विभाग, ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, पालम.
  3. तृतीय:-लातूर विभाग: श्री. महेश माध्यव उच्च माध्यमिक विदयालय, शिरूर ताजबंद.





U/19- मुली अंतिम सामना औरंगाबाद विभाग वि. कोल्हापूर विभाग दरम्यान चुरशीच्या लढतीत (२:१)सेट मध्ये पराभव करत औरंगाबाद विजयी ठरला.

  1. प्रथम: औरंगबाद विभाग: लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव .
  2. द्वितीय:कोल्हापूर विभाग: श्रीमती चंपावेन बालचंद्र शाह महिला महाविद्यालय, सांगली
  3. तृतीय:अमरावती विभाग: के. डी. विद्यालय ॲन्ड ज्यु.क. ता. पुसद .





बक्षीस वितरण सोहळास प्राचार्य डॉ. एस.आर. धोंडगे, टेनिस व्हॉलीबॉल जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, टेनिसव्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, राज्य सहसचिव मिलिंद कुलकर्णी,  विनायकराव बडे, विभागीय सचिव रामेश्वर कोरडे यांच्या हस्ते विजयी संघ चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम चे सुञसंचलन प्रा. गौड तर आभारप्रदर्शन प्रा.पी.डी हेमनर यांनी मानले. 




स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, तालुका क्रीडाधिकारी चंद्रकांत लोदगेकर, यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. पंच प्रमुख सतिश नावाडे, पंच : संतोष शिंदे, किरण घोलप, निलेश माळवे, राहुल पेटकर, विजय बोडके, सोमनाथ पोपळे, निलेश डोंगरे यांनी उत्कृष्ट काम पाहिले.








Post a Comment

0 Comments