परभणी ➡️ येथील दर्गा रोडवरील सुयोग इंग्लिश स्कूलच्या 'वाणिज्य' शाखेचा इ. बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळ औरंगाबाद कडून मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ. बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत परभणी शहरातील सुयोग इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून 11 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
यात पेंढारी अनिश अमीतकुमार हा विद्यार्थी 90.33 % गुण घेऊन प्रथम, झंवर श्रावणी सुनिल ही विद्यार्थीनी 88.50 % गुण घेऊन द्वितीय तर हांडे आभिषेक गणेश 86.17 % गुण घेऊन तृतीय आला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, पुष्पा मुंढे, संजय डहाळे, पंकज अबोटी, संजय कुलकर्णी, मधुकर गव्हाणे, प्राचार्य सिद्धार्थ गवई, सुचिता थोरवटे, अमीन मुजावर, नारायण सुर्यवंशी, मुरमुरे, शेख अमजद, विनायक गुजर आदीने अभिनंदन केले.
0 Comments