Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ प्रहार जनशक्ती पक्षाने घातले बंद वाहतूक सिग्नलचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध




     

   

परभणी ➡️  शहरामध्ये मागील १२ वर्षांपासून ट्राफिक सिग्नल व्यवस्था बंद असून शहरातील वाहतूक सिग्नल फक्त शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत. आजपासून १२ वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे २८ मे २०११ रोजी शहरातील ट्राफिक सिग्नल व्यवस्था अचानक बंद पडली व ती कायमस्वरूपी बंद झाली.आज रविवारी या घटनेला १२ वर्ष झाले आहेत. याच तारखेचे औचीत्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील ट्राफिक सिग्नल खांबाचे विधिवत पूजन करून सिग्नल खांबास प्रतीकात्मक वर्षश्राध्द घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. (vnsnews24, feature ) 





शहराची व्याप्ती व लोकसंख्या मागील १२ वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली असता नाही  शहर महानगरपालिका व पोलीस प्रशासन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नल व्यवस्था सुरू करण्यासाठी कुठलेच प्रयत्न करत नाहीत. ही सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हे अनोखे आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आंदोलकानी परभणी शहर महानगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा सुरू झाली नाही तर परभणी शहर महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.




या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटणीस वैभव संघई, मिडीया प्रभारी नकुल होगे, अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, पिंटु कदम, नारायण ढगे, सुरेश आगलावे, महिला आघाडीच्या अँड. सुवर्णा देशमुख, सुषमा देशपांडे, आशा देशमुख, सोनाली गुट्टे, शेख वशिर, माणिक कदम, सय्यद रफिक, श्याम भोंग आदींनी सहभाग नोंदविला.






Post a Comment

0 Comments