Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/गाळयुक्त अभियानामुळे शेतकऱ्यांच्या संपन्नतेत भर पडेल - ओमप्रकाश यादव





परभणी ➡️ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पने मधून राबविण्यात आलेल्या गाळ मुक्त तलाव - गाळ युक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांच्या संपन्नतेमध्ये भर पडेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले. (vnsnews24, feature ) 




शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी जिंतूर तालुक्यातील कान्हा या ग्रामपंचायती मध्ये तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.



यावेळी सरपंच शिवाजी दुभाळकर, विस्तार अधिकारी शिवराम ढोणे, ग्राम विकास अधिकारी शिवाजी मुंजे, टेक्नोस्पर्ट ग्राम विकास प्रतिष्ठान चे शैलेश सिसोदिया, सुशील सिसोदिया यांच्यासह गावकरी आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




*अभियानामुळे जलयुक्त आणि सुपीक होण्यास मदत होईल*


परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली गाळ मुक्त तलाव - गाळ युक्त शिवार अभियान राबविल्यामुळे गावातील शिवार जलयुक्त होईल आणि जमिनीची सुपीकता वाढेल असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.




शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.







Post a Comment

0 Comments