Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जागतिक तंबाखू विरोधी दिवसांर्तगत विविध कार्यक्रम व 30 पान टपरी धाडसत्र कारवाई





परभणी ➡️ जिल्हाधिकारी आंचल  गोयल तथा अध्यक्ष राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम  व  डॉक्टर सुहास जगताप जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आज जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेेेेेण्यात आले. तसेेच परभणीत तंबाखू नियंत्रण पथकाची 30 पान टपरी धारकावर धडक कारवाई केली गेली. (vnsnews24, feature ) 





31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्याच्या सूचना राज्यस्तरावरून प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालयाच्या वतीने उपविभागीय परिवहन अधिकारी परभणी व भारतीय आयुर्विमा महामंडळ परभणी यांच्या अधिकारी व कर्मचारी यांची मौखिक आरोग्य तपासणी तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबिर घेण्यात आले.




तसेच त्यांना "" आम्हाला अन्न हवे तंबाखू नको”"  या घोषवाक्याचे बद्दल माहिती सांगण्यात आली तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली त्याचबरोबर इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, धन्वंतरी शिक्षण संस्थेचे नर्सिंग, कॉलेज परिचारिका प्रशिक्षण केंद्र परभणी, तसेच मातोश्री नर्सिग विद्यालय येथे भेटून विद्यार्थ्यांना तंबाखू विरुद्ध दिवसाच्या "आम्हाला अन्न हवे तंबाखू नको"  या घोषवाक्य बद्दल माहिती सांगितली.



 

रांगोळी स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धा मध्ये भाग सहभागी होण्याचे आमंत्रित केले तसेच त्यांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन करून तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. सोबतच तंबाखू विरोधी दिवसाच्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्व नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वृंद विद्यार्थी यांची स्वाक्षरी मोहीम राबवून घेतली. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस निमित्ताने 31 मे ला सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. आहे तसेच रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन जिल्हा रुग्णालय परभणी येथे करण्यात आलेली आहे




 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने परभणी शहरांमध्ये दिनांक 25 /5 /23 ते 27 /5/23 या कालावधीत तंबाखू नियंत्रण पथकाने धडक कारवाई करत जवळपास 30 पान टपरी धारकावर कारवाई करत 16 हजार रुपयांचा दंड कोटपा कायदा 2003 चे कलम चार व कलम सहा नुसार उल्लंघन करणाऱ्या पान टपरी धारकाकडून वसूल करण्यात आला.



 

ही धाडसतराची कारवाई पोलीस प्रशासन विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग जिल्हा रुग्णालय परभणी व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कारवाईसाठी जिल्हा रुग्णालयाचे मानस तज्ञ केशव गव्हाणे व किशोर नंद समुपदेशक NCD,  मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजीत संगई पोलीस प्रशासन विभागाचे पोलीस हवालदार सुधीर सोनटक्के गंगाधर धडके व राहुल भालेराव तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे कच्छवे यांनी केली.


 




Post a Comment

0 Comments