Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयाच्या बारावीच्या निकालाची उच्चांकी





परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या बारावीच्या निकालाची परंपरा कायम राखत निकालाची उच्चांकी गाठली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९४.८२ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६.२६ टक्के, कला शाखेचे ७४.४४ टक्के तर एमसीव्हीसीचा १०० टक्के इतका निकाल लागला आहे. (vnsnews24, feature ) 

 



विज्ञान शाखेतील एकूण ४०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३८५ उत्तीर्ण झाले. डहाळे प्रणव ९०.०० टक्के घेऊन प्रथम,लासे संतोषी ८८.३३  द्वितीय, तर राऊत सेजल ८६.८३ टक्के घेऊन गुण महाविद्यालयात तृतीय आली आहे. 





वाणिज्य शाखेतील एकूण २१४ विद्यार्थी परीक्षा दिली. त्यापैकी २०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अंबुरे निर्जरा ९६.५० टक्के गुण घेवून महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. काळदाते सृष्टी प्रभाकर ९४.३३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर वाव्हळ अमृता ९२.३३ टक्के गुण घेवून तृत्तीय आली आहे. 



 


कला शाखेच्या २७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी २०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कुलकर्णी साक्षी ८७.६७ टक्के गुण प्राप्त करुन महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. मगर राधा ८६.६७ टक्के द्वितीय तर खिल्लारे सुहानी ८५.८३ टक्के घेऊन तृत्तीय आली.




उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससीव्हीसी) शाखेचा निकाल १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  सुमय्या तबस्सुम ६४.०० टक्के गुण प्राप्त करुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. चोपडे भगवान ५९.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कापुरे आकाश ५७.८३ टक्के गुण मिळवून तृत्तीय येण्याचा बहुमान मिळविला आहे.





सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सोळंके, सरचिटणीस आ. सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, उपप्राचार्य प्रा. आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक प्रा. सतीश जाधव, पर्यवेक्षक प्रा.नारायण राऊत, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


 







Post a Comment

0 Comments