Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ हलवीरा पाटीजवळ रानडुकरचा धडकेत एक ठार, एक गंभीर





जिंतूर ➡️ जिंतूर - जालना रोडवरील हलवीरा पाटी  येथील गजानन महाराज मंदिरा जवळ जोगवाडा येथील रहिवाशी असलेल्या तरुणांचा दुचाकीला रानडुक्कर धडकल्याने एकजणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 24 मे रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. (vnsnews24, feature ) 




याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवाशी असलेले भास्कर रथकर व भारत रथकर दोघेजण जोगवाड्या वरून चारठाणा येथे कामानिमित्ताने दुचाकीवरून जात असताना जालना रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ अचानक रानडुकर चालत्या दुचाकीला धडकल्यामुळे दोघेजण खाली कोसळले.





यावेळी दोघांनाही गंभीर मार लागला होता घटनेची माहिती गावात मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. देविदास गरड यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 




यावेळी रात्री 11 वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान भास्कर रथकर (वय 43 ) यांचा मृत्यू झाला तर भारत रथकर( वय 47) यांची प्रकृति गंभीर असल्यामुळे परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.





दरम्यान भास्कर रथकर यांच्यावर जोगवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत भास्कर रथकर यांच्या पाश्चात पत्नी, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.







Post a Comment

0 Comments