Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/बोरकिनी पाटीजवळ बसचालकाच्या ओव्हरटेकच्या नादात बालिकेच्या हाताची दोन बोटे तुटली




जिंतूर ➡️  ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या बस चालकाच्या चुकीने बसमधील एका बालिकेच्या हाताची दोन बोटे तुटल्याची घटना बोरकिनी पाटीजवळ आज 25 मे रोजी गुरूवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. (vnsnews24, feature ) 




याबाबत अधिक माहिती अशी  की, श्रुती प्रल्हाद शेवाळे (वय 14  वर्षे रा.वलंगवाडी ता.सेलू) ही आपल्या परिवारासह छत्रपती संभाजीनगरहुन जिंतूरकडे जाणार्‍या बस ( एमएच - 20 - बि.एल - 3604) या  बसमधून प्रवास करत असताना उलटी आल्याने ती गाडीबाहेर हात काढून उलटी करण्याचा प्रयत्न करत होती. 




त्याचवेळी बसचालक एका ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ऑटोला धक्का लागल्याने  मुलीचे हात मध्ये आल्याने तिच्या हाताची दोन बोटे तुटल्या गेली तर मनगटाचे मांस निघाले. 



यावेळी पिंपरी गीते येथील गजानन गिते,  केशव गिते या  युवकांनी प्रसंगावधान राखत मुलीला स्वत:च्या वाहनातून तात्काळ चारठाणा  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 



आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.माजेद शेख, औषध निर्माण अधिकारी विजय ढाकणे, स्टाफ नर्स सीमा सातपुते यांनी या मुलीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवले. 



या घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकिशन कोंडरे, पोलीस नाईक विष्णूदास गरूड, संजय पवार, पो.कॉ. पवन राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




Post a Comment

0 Comments