Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पुर्णा नदी पात्रात शोध मोहिमेनंतर सापडले तलाठी होळ यांचे प्रेत




जिंतूर ➡️ पुर्णा नदी पात्रात गुरूवारी (दि.25) सकाळी 11 वाजता बुडालेले तलाठी सुभाष होळ यांचे प्रेत शुक्रवारी (दि.26) दुपारी 4 वाजता संभाजीनगर येथील पाणबुडी टिमला सापडले. गुरूवारी दिवसभराच्या शोध मोहीमेनंतरही होळ यांचे प्रेत सापडले नाही म्हणून शुक्रवारी संभाजीनगर येथील पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता तलाठी होळ यांचे प्रेत नदी पात्रातून बाहेर काढले. 





उपजिल्हाधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार चौधरी यांच्यासह महसुलचा मोठा ताफा या ठिकाणी गुरुवार दुपारपासून तळ ठोकून होता. जिंतूर तालुक्यातील नदी पात्रावर वाळू माफियांना पकडण्यासाठी गुरूवारी (दि.25) सकाळी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष गणपतराव होळ हे नदी पात्रातील पाण्यात उतरले. 






नदीच्या समोरील दुसर्‍या काठावरून ट्रॅक्टरमध्ये वाळू माफिया वाळू भरत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना पकडण्यासाठी पाण्यात पोहून होळ दुसर्‍या काठावर जात होते. पाणी जास्त असल्याचा अंदाज त्यांना आला नाही. मध्यभागी गेल्यावर ते अचानक पाण्यात बुडून गायब झाले.





याबाबत माहिती मिळाल्यावर उपजिल्हाधिकारी अरूणा संगेवार, जिंतूर तहसीलदार परेश चौधरी घटनास्थळी पोहोचले. सकाळी 11 वाजल्यापासून तलाठी होळ यांचा शोध सुरू असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते मिळून आले नव्हते. शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली.



महसुलचा ताफा व पोलीस ही घटनास्थळी तळ ठोकून होता. शुक्रवारी (दि.26) दुपारी 4 वाजता संभाजीनगर येथील पाणबुडी टिमला म्हणजे ३० तासाच्या शोध मोहीमेनंतर त्यांचे प्रेत काढण्यात यश मिळाले.





Post a Comment

0 Comments