Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/मराठवाड्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट




नांदेड ➡️ मराठवाड्यात 2021-2022 या वर्षात विविध कारणांनी 1 लाख 80 हजार 958 वेळा 11 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित (इंटरप्शन्स) झाला होता. तथापि, महावितरणने काटेकोर नियोजन केल्याने 2022-23 या वर्षात केवळ 63 हजार 64 वेळा वीजपुरवठा खंडित झाला. इंटरप्शन्सचे प्रमाण 65 टक्क्यांनी घटवण्यात महावितरणला यश आले आहे. याबरोबरच 2021-2022 या वर्षात खंडित वीजपुरवठ्याचा एकूण कालावधी 5 कोटी 62 लाख 49 हजार 449 ‍मिनिटे होता. तो 2022-23 या वर्षात 82 टक्क्यांनी कमी करण्यात म्हणजे 97 लाख 61‍ हजार 31‍6 ‍मिनिटांवर आणण्यात महावितरण यशस्वी ठरले आहे.




 




डॉ.मंगेश गोंदावले यांनी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. सूक्ष्म नियोजनासह यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सातत्याने अभियंते व जनमित्रांशी बैठका व व्हीसीद्वारे संवाद साधला. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठीची नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेवर व दर्जेदार करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच वाहिन्यांची नियोजित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांना सूचना देऊन त्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला. लोकप्रतिनिधी व उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ‍आणि समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला.






वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो कमीत कमी वेळात पूर्ववत करा, पूर्वनियोजित कामांसाठी वीज बंद ठेवण्याबाबत ग्राहकांना एसएमएस व माध्यमांद्वारे माहिती द्या, कॉल सेंटरसह विविध माध्यमातून येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करा, तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा दर्जा तपासा, अशा सूचना डॉ.गोंदावले यांनी मराठवाड्यातील अभियंत्यांना दिल्या. यावर दैनंदिन देखरेख ठेवण्यासाठी व्हॉट्सग्रूप तयार करण्यात आला. या सर्व बाबींची यशस्वी अंमलबजावणी केल्याने गेल्या वर्षभरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण 65 टक्क्यांनी घटले आहे.


 


मोबाईल ॲप, बेवसाईट, कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व पेपरलेस सेवा देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार/माहिती देण्याची सुविधा, वीजबिल ऑनलाईन भरल्यास 0.25 टक्के सवलत, गो-ग्रीन संकल्पनेअंतर्गत छापील बिलाऐवजी केवळ ई-बिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रतिबिल 10 रुपये सवलत, तत्पर भरणा सूट अशा सुविधा उपलब्ध आहेत. या सेवांचा लाभ घेऊन ग्राहकांनी थकबाकीसह आपले वीजबिल ‍नियमित भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


 




Post a Comment

0 Comments