Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी





जिंतूर ➡️ येथील श्री विठ्ठल मंदिर येथे 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती सावरकर विचारमंच यांच्यावतीने साजरी करण्यात आली. (vnsnews24, feature ) 




याप्रसंगी ज्येष्ठ श्रीमान बाळासाहेब कोठेकर व माजी नगरसेवक गणेश कुऱ्हे तसेच उन्हाळे गुरु यांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सावरकर वरील आपले विचार  सागर जोशी, प्रा. अनिल संगवई, एडवोकेट योगेश उन्हाळे, मकरंद मोहरील व अनिकेत अवचाटे यांनी व सद्गुरु ब्राह्मण महिला मंडळाचे अध्यक्ष  जयश्री देशपांडे यांनी व रूपाली पारनेरकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी बहुसंख्य सावरकर प्रेमी उपस्थित होते. 



कार्यक्रम यशस्वी साठी सावरकर विचार मंच यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी  नागेशराव मोहरील, किशोर जी देशपांडे, दिलीपजी देशपांडे  शंकर जी जोशी, रणधीर शोभणे, नितीन बंगाळे, अमोल देशपांडे , खापरखुटीकर सर, रविंद्र रणसिंग, मोहन कोठेकर, वासुदेव जोशी, किशोर देशपांडे, आविनाश जोशी, रोहित देशपांडे व सद्गुरु ब्राह्मण महिला मंडळ सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







Post a Comment

0 Comments