Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ एसेगाव पाटी जवळ कार व ऑटो अपघातांत ४ जण जखमी





जिंतूर ➡️ जिंतूर - परभणी रस्त्यावरील एसेगाव पाटी जवळ ऑटो - कार यांच्यात झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले असून सदर घटना दि. ३० डिसेंबर दुपारच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील एकाची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (vnsnews-24, accident, jintur) 



जिंतूर - परभणी रस्त्यावरील एसेगाव पाटी जवळ भरधाव कार व ऑटो अपघात दि.३० डिसेंबर दुपारी १२ च्या सुमारास घडल्याने या अपघातातील चार जखमीना खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. 




यात रुग्णालयांतील डॉ.परिहर, सिस्टर घातगीने, घुगे, सोनटक्के, जवळे, हरकळ आदींनी या अपघातात जखमी संजय उत्तमराव कामीटे (वय ४० वर्ष) मोहन डिगबर बुधवंत (वय २० वर्ष) अभिजीत संजय कामीटे (वय १६ वर्ष) हे सर्व रा.पांगरी ता.जिंतूर व पुंजाजी जीजाऊ माने रा.माथला ता.जिंतूर वर प्राथमिक उपचार केले.  यातील मोहन बुधवंत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून बातमी देईपर्यंत पोलीसात नोंद झालेली नव्हती. (vnsnews-24, accident, jintur) 




Post a Comment

0 Comments