Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणसाठीची कार्यशाळा संपन्न





परभणी ➡️ राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणासाठीची दोन दिवसीय कार्यशाळा परभणी तालुक्यातील पिंगळी व लोहगाव येथे संपन्न झाली. (vnsnews-24, gov, parbhani) 



आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळी व लोहगाव सर्कलमधील सरपंच, ग्रामसेवक, आशाताई, अंगणवाडी यांच्यासाठी शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणासाठीच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्वेता काळे यांच्या वतीने करण्यात आले होते. 




संयुक्त राष्ट्र संघटने द्वारे स्वीकारलेल्या शाश्वत विकास ध्येय 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत गाव विकास आराखड्यामध्ये सदर ध्येयाचा समावेश करावयाचा आहे. 



आमचा गाव आमचा विकास आराखड्यामध्ये शाश्वत विकास ध्येयाचे प्रतिबिंबित करण्यासाठी करावयाच्या तरतुदी व उपाय योजना यासंबंधीचे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये करण्यात आले.



सदर कार्यशाळेत परभणी तालुक्यातील पिंगळी आणि लोहगाव सर्कल मधील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, आशा व अंगणवाडी कर्मचारी, मुख्याध्यापक, बचत गटातील अध्यक्ष सचिव तसेच संसाधन व्यक्ती यांच्यासह आदींची उपस्थिती होती.(vnsnews-24, gov, parbhani) 







Post a Comment

0 Comments