Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नववर्षदिनी महेश मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण आयोजन रविवारी





परभणी ➡️ येथील विष्णू नगरातील महेश मंदिरात नववर्षानिमित्त रविवारी (दि.1) 108 संगीतमय हनुमान चालिसा पठण होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.(vnsnews-24, feature, parbhani )         




यावेळी 50 हून अधिक हनुमान भक्त परिवारांचा सहभाग असलेले बजरंगी हनुमान चालिसा मंडळ मागील बारा वर्षांपासून शहरात विविध ठिकाणी दर शनिवारी  संगीतमय सामूहिक हनुमान चालिसा पाठाचे आयोजन करते. यामध्ये शेकडो हनुमान भक्त उत्स्फूर्तपणे, परिवारासह सहभागी होतात. 



रविवार दि.1 जानेवारी 2023  रोजी नववर्षानिमित्त 108 संगीतमय हनुमान चालिसा  पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती आणि कोरोनापासून समाजातील नागरिकांच्या बचाव व्हावा यासाठी तसेच प्रतिकारशक्ती  वाढावी यासाठी प्रार्थना म्हणून  हा कार्यक्रम आहे.





रविवारी सकाळी आठ वाजता आरतीने संगीतमय हनुमान चालिसा पठण सुरू होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते चालणार आहे. महाआरतीने  पठणाचा समारोप होणार आहे. यामध्ये अनेक हनुमान भक्त सहभागी होणार आहेत.(vnsnews-24, feature, parbhani )         








Post a Comment

0 Comments