Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी सायबर विशेष मोहिमे अंतर्गत 52 हरवलेल्या मोबाईलचा पोलिसांनी लावला शोध, मुळमालकास केले परत





परभणी ➡️ जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 612 मोबाईल गहाळ दाखल झाले होते. त्यातील एकूण 341 मोबाईलचा सायबर पोलिसांनी शोध लावला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक  रागसुधा आर. यांनी पत्रकार परिषदेत दिली. (vnsnews-24, feature, parbhani ) 




दिनांक 23 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम राबवून अंदाजे 7 लाख 50 हजार  रुपये किमतीचे एकूण 52 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध लावण्याबाबत मार्गदर्शन करून विशेष राबविण्याबाबत सायबर पोलीस सेलचे स.पो.नि.जी.टी.बाचेवाड व त्यांच्या अधिपत्याखालील अंमलदार यांना आदेशीत केले. विशेष मोहिमे अंतर्गत सायबर पोलीस ठाण्याकडून हरवलेल्या मोबाईलची माहिती घेवून संबंधीत पोलीस ठाण्याला माहिती पुरविण्यात आली. 




या विशेष मोहिमे अंतर्गत नवा मोंढा, परभणी पोलिस ठाणे हद्दीतील 16 मोबाईल,  नानलपेठ ठाणे हद्दीतील येथील 12 मोबाईल,  कोतवाली हद्दीतील 10 मोबाईल,  जिंतूर ठाणे हद्दीतील 4 मोबाईल, सेलू येथील 7 मोबाईल, सोनपेठ येथील 2 मोबाईल व मानवत पोलिस ठाणे हद्दीतील 1 असे एकूण 52 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्या मुळ मालकाची खात्री करून सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे परत देण्यात येत आहेत. 





सन 2022 या वर्षामध्ये 104 मोबाईल हस्तगत करून फिर्यादीस परत करण्यात आलेले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक  रागसुधा आर. व अपर पोलीस अधीक्षक परभणी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीपान शेळके, पो.नि. समाधान चौरे, पो.नि. शरद जऱ्हाड, पो.नि. रावसाहेब गाडेवाड, पो.नि.रमेश स्वामी, स.पो.नि.संदीप बोरकर, स.पो.नि. कोकाटे स.पो.नि.जी.टी.बाचेवाड यांचे सह सायबर पोलीस सेल येथील पोलीस अंमलदार बालाजी रेड्डी, रवि भुमकर, रंजीत आगळे, गौस पठाण, राजेश आगाशे, स्वप्नील पोतदार, राम घुले, तसेच गणेश कौटकर व संतोष व्यवहारे यांच्या पथकाने केली




यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस निरीक्षक संदीपान शेळके, समाधान चौरे, सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड आदी उपस्थित होते.  (vnsnews-24, feature, parbhani ) 







Post a Comment

0 Comments