Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/नवीन वर्षाच्या पहाटेच सख्या भावाने केला भावाचा खून; परभणीच्या मराठवाडा प्लॉट परिसरात घटना





परभणी ➡️  दोन संख्या भावामध्ये वाद होऊन एका भावाने दुसऱ्या भावाला चाकू, काचेचा ग्लास व पाण्याची कळसिने मारहान केल्यामुळे त्याच्या मृत्यू  झाल्याची घटना नवीन वर्षाच्या पहाटे एक जानेवारी रोजी 5.30 वाजता उघडिस आली. या संदर्भात नानलपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 





पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार परभणीतील मराठवाडा प्लॉट परिसरात शकुंतलाबाई कोंडीबा वाघमारे (७५) ह्या मराठवाडा प्लॉट भागात राहतात. शकुंतलाबाई या गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. आरोपी सुनील कोंडीबा वाघमारे (४९, रा.मराठवाडा प्लॉट) व मयत सतीश कोंडीबा वाघमारे (४३, रा.मराठवाडा प्लॉट, साई कॉर्नर)  ही त्यांची दोन मुले. याशिवाय त्यांचा अन्य एक मुलगा रामचंद्र हा पोस्ट कॉलनी भागात राहतो. सुनील आणि सतीश वाघमारे हे आई शकुंतलाबाई यांच्यासमवेत मराठवाडा प्लॉट येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान ही खूनाची घटना घडली. 




यात मयत सतीश यांनी भाऊ सुनील यास तू इथे का आलास असे विचारले असता आरोपी सुनील वाघमारे याने भाऊ सतीश यांच्या गालावर ठोसा मारला तसेच चाकूने व फुटलेल्या काचेच्या ग्लासाने व त्याच्या तुकड्याने आणि कळशी मारून सतीश यास गंभीर जखमी केले. यात सतीश यांना रक्तस्त्राव झाला, यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्री मयत सतीश यांच्या शेजारीच आरोपी भाऊ सुनील हा बसून होता. ही बाब घराशेजारी राहणारे भाडेकरू, साक्षीदार यांना रविवारी सकाळी समजली. 




त्यांनी सदरील माहिती नानलपेठ पोलिसांना दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी, पंचनामा केला. रामचंद्र कोंडीबा वाघमारे (वय ४०, रा.पोस्ट कॉलनी, दर्गा रोड, परभणी) यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी भेट दिली.(vnsnews-24, crime, parbhani ) 










Post a Comment

0 Comments