Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/आंतर जिल्हा ट्रॅक्टर पळविणारी टोळी जाळ्यात; चार गुन्ह्यांची उकल





परभणी ➡️ आंतर जिल्हा ट्रॅक्टर पळविणारी एक टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणली असून या टोळीतील चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याद्वारे चार गुन्ह्यांची उकलही झाली आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 



स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विविध पथकांद्वारे जिल्ह्यातील घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व चोर्‍यांच्या घटनेतील आरोपींच्या शोधाचे काम सुरु होते. त्यावेळी गुरुवारी (दि.29) रात्री या पथकांना जिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गुन्ह्यातील चौघा संशयित आरोपींचा सुगावा लागला. त्याप्रमाणे या विभागाने चार पथके गठीत करीत गोपनीय माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे संबंधित संशयित व्यक्तींचा शोध सुरु केला. 



जिंतूरच्या हद्दीत केलेल्या शोधाशोधीत दत्ता केराजी कोकाटे (रा. रिसोड), बाळू प्रल्हाद कोकाटे (रा. केहाळ), शरद उध्दवराव सुरकुटे (रा. रिसोड) व अर्जून श्रीपती महागडे (रा. केहाळ) हे चौघे अर्जून महागडे याच्या केहाळ शिवारातील शेतात लपून बसले आहेत. त्या ठिकाणी दोन ट्रॅक्टरही लपवून ठेवले आहेत. ते ट्रॅक्टर विक्रीसाठी घेवून जाणार आहेत, अशी माहिती कळाल्याबरोबर पोलिसांच्या पथकाने तातडीने छापा टाकून बाळू कोकाटे, शरद सुरकुटे व अर्जून महागडे या तीघांना ताब्यात घेतले. 





चौथा दत्ता कोकाटे हा तेथून फरार झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत शेतावरील ट्रॅक्टरपैकी 1 ट्रॅक्टर सावंगी येथून तर दुसरा केहाळ शिवारातून चोरुन आणला असल्याचे आरोपींनी स्पष्ट केले. पोलिसांनी खाक्या दाखविताच या तिघांनी परभणी व वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी ट्रॅक्टर चोरीचे काम केल्याची माहिती निष्पन्न झाली. हे टोळके पळविलेले ट्रॅक्टर हरियाणा राज्यात जावून विक्री करत, हे ही स्पष्ट झाले. 






दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक आर. रागसुधार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रभारी अधिकारी व्ही.डी. चव्हाण यांच्यासह नागनाथ तुकडे, व्ही.एम. कुसुमे, साईनाथ पुयड, मारोती चव्हाण, बाळासाहेब तुपसुंदरे, नामदेव डुब्बे, संजय घुगे, प्रशांत गायकवाड, राम पौळ, मधुकर ढवळे, रफियोद्दीन, अनिल कोनगुलवार, हुसेन खान, विकास कोकाटे, हनुमंत जक्केवाड, दत्तात्रय गुंगाणे, अरविंद धबडे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी या कामात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कौतूक केले आहेत. या प्रकरणातून परभणी व हिंगोली जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 







Post a Comment

0 Comments