Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सीएचओपदी होमिओपॅथीक डॉक्टरांची निवड करा; होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन





जिंतूर ➡️ राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आयुक्त राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियान, संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी दि. ०९ डिसेंबर २०२२ रोजी समुदाय आरोग्य अधिकारी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. (vnsnews-24, feature, jintur) 




या भरती प्रक्रियेमध्ये बीएचएमएस तसेच होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एकही जागा पात्र म्हणून ठेवण्यात आली नाही. देशात इतर राज्यांमध्ये सीएचओपदी होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक औषधशास्त्र हा अतिरिक्त कोर्स करूनही सी एच ओ पदी होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एकही जागा ठेवण्यात आलेली नाही.





हा राज्यातील ८५ हजार डॉक्टरांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. सदर भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून, नवीन जाहिरात प्रकाशित करून, भरती प्रक्रियेत होमिओपॅथीक डॉक्टरांचा समावेश करावा अशी मागणी जिंतूर होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करण्यात आली आहे.




या निवेदनावर डॉ. इरफान खान अगई, डॉ. मंत्री शैलेश, डॉ. जीशांन पठाण, डॉ.सोनल चिडिया बोरा, डॉ. अशोक खके, डॉ. जगदीश मोरे, डॉ. योगेश तुरे, डॉ. सचिन कडे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. जगदीश बोकन, डॉ. सीमा देशमुख, डॉ. बन्सीधर देवघर, डॉ. प्रियंका ठाकूर, डॉ. अंकुश हाके, डॉ. बी. के. पाचरणे आदींच्या सह्या आहेत. (vnsnews-24, feature, jintur) 












Post a Comment

0 Comments