Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/परभणीकरांच्या रक्तदानातून 10 हजार रक्तपिशवी जमा




परभणी ➡️ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नेतृत्वात जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 10 हजार रक्तपिशवी रक्त जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी दिली आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 



वर्षभरातील विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त जमा झाले असून, रक्तदात्यांनी यापुढेही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक भान जपण्याचे आवाहन  डॉ. जगताप यांनी केले. 





रक्तदान करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत असून, रक्तदाते स्वत:हून पुढे आल्यामुळेच विक्रमी रक्त जमा झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रक्त जमा केल्याबद्दल डॉ. जगताप यांनी रक्त केंद्रातील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचा-यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 




रक्तपेढीमध्ये विक्रमी रक्तसंकलन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वी करण्यात आली. यासाठी जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मनिषा राठोड, डॉ. पुजा भरोसे, रक्तपेढीतील सर्व रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक, तांत्रिक पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (vnsnews-24, feature, parbhani ) 




Post a Comment

0 Comments