Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ बाराशिव व जवळाबाजार येथे किशोरवयीन मुलींसाठी आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद





💠डॉ.आशा चांडक यांनी केले मार्गदर्शन एचएआरसी संस्थेचा उपक्रम 

हिंगोली ➡️ बुधवार रोजी बाराशिव व जवळाबाजार  येथे दोन सत्रात 6 वी ते 12 वितील किशोरवयीन मुलींसाठी 'मासिक पाळी व्यवस्थापन' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएचआरसी) या संस्थे तर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी दोन्ही सेशन मधील ऐकून 1550 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती. (vnsnews-24, gov, hingoli ) 




सकाळी 12:20 ते 2 दरम्यान पहिले सत्र निवासी हायस्कुल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्राचार्या सुनिता कातोरे, पर्यवेक्षक प्रा.गजानन मुळे, उपमुख्याध्यापक संजय ठाकरे, प्रा.चिंतामण जाधव, प्रा.सुर्यकांत जाधव, लक्ष्मीकांत कोपले, प्रा.शिंदे व्ही.टी, प्रा.सुधाकर फाजगे उपस्थित होते. या सत्रात शाळेच्या व महाविद्यालयाच्या एकुण 550 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. 




दुसरे सत्र दुपारी 2 ते 03:30 दरम्यान इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजार येथे आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य सौ बांगर एस पी, राखोंडे यु.न. ,वऱ्हाडे डी एस, स. यू. चव्हाण, ए एस पूर्णे,  यांची उपस्थिती होती. या सत्रात 6 वी ते 10 वितील ऐकून 1000 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती. या दोन्ही सत्रात प्रस्तावना प्रा पद्मा भालेराव यांनी केली. 




या कार्यक्रमात डॉ. आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.  




या दोन्ही समुपदेशन सत्रात 1500 विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे  वाटप करण्यात आले. तसेच मुलींसाठी 'मेन्स्ट्रुपेडिया' या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे वाटप करण्यात आले.





कार्यक्रमाच्या शेवटी किशोरवयीन मुलींना 'कोणतेही सण, धार्मिक कार्य किंवा यात्रा आहे म्हणून मासिक पाळी लांबविण्याच्या गोळ्या न खाण्याची व स्त्रीत्वाचा सन्मान राखण्याची शपथ देण्यात आली". प्रास्ताविक प्रा पद्मा भालेराव यांनी केले. या दोन्ही कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, प्रा.पद्मा भालेराव, ऍड. शीतल राजुरे व विद्या राठोड यांनी प्रयत्न केले.(vnsnews-24, gov, hingoli) 




Post a Comment

0 Comments