Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयाचे नॅक समितीद्वारे होणार पुनर्मुल्यांकन





💠 चौथ्यांदा होतेय नॅक पुनर्मुल्यांकन 

परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या नॅक पुनर्मुल्यांकनाच्या चौथ्या अवर्तनासाठी गुरुवार आणि शुक्रवार (दि.२९ व ३०) रोजी नॅक समिती भेट देणार आहे. (vnsnews-24, education, parbhani) 





सदरील समितीत उत्तरप्रदेशातील माँ शाखंभरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. हृदयशंकर सिंह हे समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. सदस्य सचिव म्हणून दिल्ली येथील दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजीवकुमार तर सदस्य म्हणून केरळातील सेंट जोसेफ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फादर गिलसन जॉन हे उपस्थित राहणार आहेत. 





दोन दिवस चालणाऱ्या या पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत अध्ययन, अध्यापन, संशोधन, भौतिक सुविधा, आजी माजी विद्यार्थी संवाद, विविध विभाग भेटी, पाठ्यक्रमेत्तर उपक्रम, नाविन्यता आदी कार्याविषयी पुनर्मुल्यांकन करून मागील पाच वर्षात केलेल्या कार्याची पाहणी करणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी दिली. या भेटी दरम्यान मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव सोळंके, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंत जामकर, सर्व सदस्य, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे उपस्थित राहणार आहेत.





05 वर्षांपूर्वी तिसऱ्या अवर्तनात महाविद्यालयास नॅक समितीच्या मूल्यांकनात अ+ दर्जा मिळाला होता. जिल्ह्यातील चौथे पुनर्मुल्यांकन करणारे एकमेव महाविद्यालय म्हणून सदरील महाविद्यालयाचा नावलौकिक होणार आहे. २९ डिसेंबर रोजी दुपारी २.०० सदरील समिती महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद करणार असल्याने यावेळी अधिकाधीक माजी विद्यार्थी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.जाधव यांनी केले. (vnsnews-24, education, parbhani) 









Post a Comment

0 Comments