Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन के.बा. विद्यालय सेलू येथे संपन्न





सेलु ➡️ शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व के. बा. विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने, सेलू तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथे करण्यात आले होते. (vnsnews-24, sports, selu ) 




प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के.बा. शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयंत दिग्रसकर तर उद्घाटक म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत उपस्थित होते. तसेच, याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख रोकडे, भिते, के.बा. विद्यालयाचे मुख्याध्यापक  कौसडीकर, के.बा. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नावकर यांचीही उपस्थिती होती. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातून उच्च प्राथमिक गटातून 45 संच, माध्यमिक गटातून 14 व शिक्षकांच्या गटातून 7 संच उपस्थित होते. सदर स्पर्धेत विजयी स्पर्धक निम्न प्रमाणे आहेत.




💠 उच्च प्राथमिक गट  

1️⃣ प्रथम क्रमांक - वरद गोविंद सारडा, प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू.

2️⃣ द्वितीय क्रमांक - लाये समृद्धी शरद, नूतन कन्या सेलू.

3️⃣ तृतीय क्रमांक - बेरगुडे सायली रंजीत, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल.



💠 माध्यमिक गट 

1️⃣ प्रथम क्रमांक - इबितवार वैष्णवी बंडू, शांताबाई नखाते विद्यालय वालूर.

2️⃣ द्वितीय क्रमांक - अब्दुल बारी, प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू.

3️⃣ तृतीय क्रमांक - प्रताप पोळ, ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू.

 



💠 शैक्षणिक साहित्य (शिक्षक गट)

🔸उच्च प्राथमिक गट -  कीर्ती राऊत.

🔹माध्यमिक गट -  गांजापुरकर.

♦️प्रयोगशाळा सहाय्यक - हजारे.


यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.सदर विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक  म्हणून कवडे, झमकडे, जाधव, आकात यांनी कामकाज पाहिले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी के.बा.विद्यालय चा सर्व स्टाफ व गटसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (vnsnews-24, sports, selu ) 






Post a Comment

0 Comments