Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलूच्या तीन विद्यार्थीनीचा समावेश




सेलु ➡️ राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा दि. 27 ते 29 डिसेंबर 2022 रोजी हसन कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघानी प्रथम क्रमांक मिळाला. राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर व सिनियर मुला-मुलींचा स्पर्धेसाठी  महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला होता. या राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर मुलींचा संघात एल. के. आर. आर. प्रिंन्स इंग्लिश ( CBSE ) स्कूल सेलूच्या विध्यार्थीनी शिवकन्या ज्ञानदेव काळे, गीता अंकुश माघाडे, लता ज्ञानदेव घोगरे यांचा समावेश होता. तसेच महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करण्यास एल.के.आर. आर. प्रिंन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी शिवकण्या काळेला संधी भेटली. (vnsnews-24, sports, selu )   

 


महाराष्ट्र संघांनी आपल्या गटातील  केरळ, हरियाणा, राजस्थान, आंध्रप्रदेश व तामिळनाडू याना मोठया गुणांनी नमवित अंतिम सामना फेरीत धडक मारली.यामध्ये गीता अंकुश माघाडे व शिवकण्या ज्ञानदेव काळे याचा सिंहाचा वाटा आहे.




अंतिम सामना हा मध्यप्रदेश सोबत खेळत असताना पहिल्या फेरीत मध्यप्रदेश 2 गुण व महाराष्ट्र 6 गुण असून महाराष्ट्र संघ हा 4 गुणाने पुढे असून दुसऱ्या फेरीत मध्यप्रदेश 1 गुण व महाराष्ट्र 4 गुण होते.एकंदरीत पूर्ण खेळात मध्यप्रदेश 3 गुण व महाराष्ट्र 10 गुण असे सूत्र होते.महाराष्ट्र संघाने पहिल्या फेरीत 4 गुणाने आपली बढती ठेवून दुसऱ्या फेरीत देखील 3 गुणाची बढत कायम राखून मध्यप्रदेश संघाला पराजीत केले.अंतिम सामन्यात देखील शिवकण्या ज्ञानदेव काळे चे 5 गुण व गीता अंकूश माघाडे चे 3 गुण महत्त्व पूर्ण ठरून महाराष्ट्र संघांनी सुवर्णपदकावर नाव नोंदवल




सबज्युनियर मुली महाराष्ट्र संघ :- शिवकण्या काळे ( एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , गीता माघाडे ( एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , लता ज्ञानदेव घोगरे ( एल के आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू )सृष्टी अकोलकर (औरंगाबाद), सिध्देश्वरी कपटे (औरंगाबाद) ,समृद्धी शिंदे(रायगड) , दुर्बी मलिक (मुंबई उपनगर ) , अंजली सातपुते ( औरंगाबाद ) , तपस्या दुबे ( रायगड ), रिया तांबूस (औरंगाबाद) , गौरी पवार ( मुंबई उपनगर ), स्नेहा पवार ( औरंगाबाद ) , हर्षदा कोलते ( औरंगाबाद ) एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू चे अध्यक्ष माननीय डॉ.संजय रोडगे यांनी महाराष्ट्र संघाने यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच आपल्या शाळेचे , जिल्याचे व महाराष्ट्रचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक करावे असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अक्षय साळवे, बालाजी कटारे  (क्रीडाशिक्षक) आणि निवड झालेल्या सर्व विद्यार्थीनीचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, डॉ. रामराव रोडगे,एल. के.आर.आर. प्रिंन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉसपरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षिरसागर, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, आदिवासी प्रकल्प विभागाचे प्राचार्य नारायण रोडगे, उप प्राचार्य श्रीकृष्ण खरात आदी उपस्थित होते.(vnsnews-24, sports, selu )   




Post a Comment

0 Comments