Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ फेन्डस क्लब सेलूच्या वतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा उद्घाटन




सेलू ➡️ टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने फेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने 24 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा सेलू येथे दि. 29 ते 31 डिसेंबर दरम्यान फेन्डस क्लब क्रीडांगणावर प्रकाश झोतात आयोजित करण्यात आल्या आहेत. (vnsnews-24, sports, selu) 






या स्पर्धेत राज्य संघटनेचे मान्यतेने राज्यतील 22 जिल्हा पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. सहभागी संघाची भोजन व्यवस्था व निवास व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रकाश झोतात दोन क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. दि. 30 डिसेंबर रोजी सायं 4 वाजता 24 वी राज्य टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. 





या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल महासंघाचे महासचिव डॉ.व्यंकटेश वांगवाड, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक रागसुधा आर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, नू.वि.शि.सं सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, अरविंद विद्यागर, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 



राज्य स्पर्धेत सहभागी जिल्हा संघ: परभणी,बीड,हिंगोली, पुणे, अकोला, मुंबई उपनगर, नांदेड, वाशिम,औरंगाबाद,नागपूर  सांगली, सोलापूर, बुलढाणा, अमरावती ,नंदुरबार , जालना, नाशिक,परभणी मनपा, नागपूर मनपा, यवतमाळ ,लातूर, कोल्हापूर, सोलापूर मनपा, चंद्रपूर, अमरावती आदीचा समावेश आहे.

 





स्पर्धेच्या जय्यत तयारीसाठी निवास,भोजन, क्रीडांगण, स्वागत, उद्घाटन व समारोप  विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.‌ स्पर्धा परभणी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, कार्याध्यक्ष विनोदराव बोराडे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत बोराडे, आयोजन समितीचे सचिव ओमप्रकाश तोष्णीवाल, राज्य महासचिव गणेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोराडे, गिरीष लोडाया, राजेश गुप्ता, रविंद्र कुलकर्णी, प्रा.नागेश कान्हेकर जिल्हा सचिव सतिश नावाडे, डी.डी.सोन्नेकर, प्रशांत नाईक , नंदलाल परताणी, मदनलाल करवा, ज्ञानोबा आण्णा बोराडे, जुगलकिशोर बाहेती, भाऊसाहेब केवारे, तुकाराम बोराडे,भास्कर बोराडे, राजेंद्र बोराडे, शाम झंवर, उध्दव पवार, रविंद्र केवारे, सुरेंद्र गिल्डा, अतुल बोराडे, जिकर भॉई आदी परीश्रम घेत आहेत. (vnsnews-24, sports, selu) 








Post a Comment

0 Comments