Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ चालू बीलाची वसुली पन्नास टक्कयाच्या खाली, चालू वीजबिलांसह 351 कोटी 56 लाख रूपयांची थकबाकी





♦️वंदेमातरम…! मी महावितरणमधून बोलतोय

♦️सहकार्य करा, वीजबिल भरा ! थकबाकीदार ग्राहकांना महावितरणची साद

परभणी ➡️ वंदेमातरम…! मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…’ असे विनम्र आवाहन करणारे फोन वीजग्राहकांना महावितरणचे कर्मचारी सध्या करीत आहेत. मात्र आपण या फोनची वाट न पाहता एक जबाबदार नागरिक व वीजग्राहक म्हणून आपले वीजबील नजिकच्या वीजबील भरणा केंद्रात किंवा ऑनलाईनच्या विविध पर्यायांचा वापर करत बील भरुन सहकार्य करावे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही सर्व वीजबील भरणा केंद्र सुरू राहणार असून देय तारखेच्या आत वीजबील भरावे असे विनम्र आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.


 


कोरोनाच्या संक्रमण काळात वसूली ठप्प झाल्याने महावितरणने वीजबील वसूलीसाठी प्रत्येक वीजग्राहकांना फोन करून वीजबील भरण्याचे विनम्र आवाहन केले होते. मात्र पुन्हा एकदा फोन व्दारे साद घालण्याची वेळ महावितरणच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.  नोव्हेंबर 2022 अखेर परभणी जिल्हयातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल 351 कोटी 56 लाख रूपये थकले आहेत. यामध्ये परभणी शहर, ग्रामीण सोबतच पुर्णा व पाथरीचा समावेश असलेल्या परभणी विभाग क्रमांक एक मधील घरगुती ग्राहकांकडे 146 कोटी 35 लाख रूपयांची थकबाकी आहे तर चालू देयक 9 कोटी 29 लाख रूपयांचे आहे. तर व्यावसायिक ग्राहकांकडे 3 कोटी 15 लाखांची थकबाकी असून 2 कोटी 32 लाख रूपयांचे चालू बीलाचे येणे आहे. 





त्याचबरोबर औद्योगिक वीजग्राहकांकडे 5 कोटी 92 लाख रूपयांची थकबाकी आहे तर 1 कोटी 70 लाख रूपयांचे चालू वीजदेयक येणे आहे. त्याचबरोबर गंगाखेड, सेलू, जिंतूर, सोनपेठ, पालम व मानवत तालूक्यांचा समावेश असलेल्या  परभणी विभाग क्रमांक दोन मधील घरगुती ग्राहकांकडे 163 कोटी 91 लाख रूपयांची थकबाकी आहे तर चालू देयक 8 कोटी 68 लाख रूपयांचे आहे. तर व्यावसायिक ग्राहकांकडे 2 कोटी 97 लाखांची थकबाकी असून 1 कोटी 34 लाख रूपयांचे चालू बीलाचे येणे आहे. त्याचबरोबर औद्योगिक वीजग्राहकांकडे 4 कोटी 32 लाख रूपयांची थकबाकी आहे तर 1 कोटी 61 लाख रूपयांचे चालू वीजदेयक येणे आहे. आज पर्यंत परभणी विभाग क्रमांक 1 ची वसुली केवळ 7 कोटी 23 लाख रूपये झाली आहे तर परभणी विभाग क्रमांक 2 ची वसुली ही 4 कोटी 31 लाख रूपयांची झाली आहे.


 


वीजदेयक भरण्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी वीजबील भरण्याचे प्रमाण समाधान कारक नाही. त्यामुळेच वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार ध्वनीक्षेपक, एसएमएस, व्हॉटसअप ग्रूप या माध्यमांसोबतच आता वीजग्राहकांना प्रत्यक्ष भेट देत वीजबीलाबाबत समाधान करून आणि मोबाईल व्दारे संवाद साधत वीजबील भरण्याविषयी जनजागृती केली जात आहे. याकरिता दैनंदिन कामासोबतच विभागनिहाय खास कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


 


वीजदेयक वसुलीमध्ये परभणी जिल्हा हा सर्वात मागे असून डिसेंबर महिना संपत आला तरी साठ टक्कयांच्यावर वीजबील वसुली जात नाही. महावितरणचे कर्मचारी विविध माध्यमांव्दारे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र जोपर्यंत वीजग्राहक स्वत: पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत वसुलीमध्ये समाधानकारक यश प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर अधीकारी व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के कार्यक्षमता वापरून थकबाकीसह चालू मागणीचे बील वसूलीसाठी प्रयत्न करावेत. याकामात कूचराई केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ही वरिष्ठ कार्यालयाने दिला आहे. वीज देयक वसुलची स्थिती लक्षात घेता वीजग्राहकांनी इतर गरजांप्रमाणेच वीजबीलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.







Post a Comment

0 Comments