Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व चिकित्सा शिबिर यशस्वीरित्या संपन्न




जिंतूर  ➡️ प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन , परभणी आणि जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व चिकित्सा शिबिराचा १३८  रुग्णांनी घेतला  लाभ. (vnsnews-24, feature, jintur)                        



भगवान श्री धन्वंतरी च्या कृपाशीर्वादाने ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा या निमित्ताने आणि पंचकर्म शिरोमणी आ. गुरुवर्य कै. वैद्य  प्र .ता.  जोशी ( नाना )  यांच्या स्मरणार्थ येथील धन्वंतरी चिकित्सालयात मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व चिकित्सा शिबिराचा आयोजन सकाळी १० ते दुपारी २ वा. पर्यंत  करण्यात आले होते .




कार्यक्रमाची सुरुवात जिंतूर मध्ये रॅली काढून करण्यात आली या रॅलीमध्ये सर्व वैद्य  व जवाहर विद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक  उपस्थित होते. या शिबिराची सुरुवात भगवान धन्वंतरीच्या पूजनाने व दीपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांचा स्वागत करून झाली  या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या जीर्ण व्याधी वर औषधी आणि भेदन , विद्यकर्म हे उपकर्म मोफत करण्यात आले .                     




या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक वैद्य शिवप्रसाद सानप प्रमुख अतिथी वैद्य दत्तात्रय दगडगावे , वैद्य प्रफुल्ल मुंदडा , वैद्य सायली कदम , वैद्य पंडित दराडे , वैद्य संदीप चव्हाण इ.  मान्यवर उपस्थित होते.  वैद्य प्रफुल्ल मुंदडा व वैद्य दत्तात्रय दगडगावे  यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण उत्तम आहार विहार आणि दिनचर्याचे पालन केले तर आपले शरीर व मन यांचे उत्तम संतुलन ठेवून आपले स्वस्थ  उत्तम ठेवू शकतो असे मनोगत व्यक्त केले . 




यावेळी गेल्या वीस वर्षापासून ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा आयुर्वेद व पंचकर्मद्वारे रुग्णांची यशस्वी चिकित्सा केल्याबद्दल वैद्य शिवप्रसाद दत्तराव सानप यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्रक देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच यशस्वी आयोजनाबद्दल सर्व वैद्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.                  






या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य शिवप्रसाद सानप प्रस्तावना वैद्य पंडित दराडे आभार वैद्य संतोष घुगे यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता वैद्या गीतांजली कान्हडकर , वैद्या  अल्का घुगे , वैद्या प्रणिता चवंडके ,  वैद्य संतोष घुगे , वैद्य संदीप काळेगोरे , वैद्य नितीन काबरा, वैद्य बाळासाहेब घुगे , वैद्य श्रीनिवास घुगे , वैद्य भागवत सांगळे, वैद्य किशोर घुगे, वैद्य विजय बुधवंत, वैद्य परमेश्वर कांगणे,  वैद्य जुनेद खान पठाण,  वैद्य गंगाधर ठाकरे ,  वैद्य  गजानन नव्ह।ट , वैद्य विनायक नागरे आणि मंगेश तारे, रोहन वाकळे यांनी अथक परिश्रम घेतले. (vnsnews-24, feature, jintur)   










Post a Comment

0 Comments