Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरूजी हे वेदांताचे महामेरू





जिंतूर ➡️ परभणी जिल्ह्यातील थोर संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी वेदांताचे अभ्यासकच नव्हे तर महामेरू होते असे विचार 07 दिवशीय भागवत सप्ताह मध्ये सर्वच कीर्तनकार महाराज मंडळीने गुरुजी विषयी विविध उदाहरण देऊन पुण्यस्मरण सोहळ्यात आनंद निर्माण केला.(vnsnews-24, feature, jintur) 







त्यांच्या जीवनावर सर्वच महाराजांनी आपले विचार व्यक्त केले वेदांत केसरी म्हणून सुपरिचित व्यक्तिमत्व गुरुजी यांची परभणीत समाधी असून जन्मस्थळ सोनपेठ आहे आळंदी पंढपुर येघे त्यांचे  आध्यमिक शिक्षण तर काशी येथे वेदांत केसरी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. (vnsnews-24, feature, jintur) 

 



परभणीकर गुरुजी यांच्या 53 व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजिन स्वामी महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर येथील श्री नगरेश्वर मंदिरात करण्यात आले होते. 07 दिवशीय कार्यक्रमात दररोज ज्ञानेश्वरी पारायण प पु भागवताचार्य हभप अमृत महाराज जोशी यांची कथा तर दररोज रात्री कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. 





दर वर्षी या सप्ताहाचे आयोजन अव्यहत पणे करण्यात येते काल्याचे कीर्तन हभप भीमराव महाराज भिलजकर यांचे झाले काल्याचे महत्व विशद करून महाराजांनी समारोप केला. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.(vnsnews-24, feature, jintur) 







Post a Comment

0 Comments