Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेचे कोल्हापुरला सर्वसाधारण विजेतेपद





परभणी ➡️ जिल्हा अ‍ॅथलेटीक्स संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदक कोल्हापूर जिल्ह्याने पटकावले. तर विविध वयोगटाचे सुवर्णपदक रामेश्वर मुंजाळ, ओंकार पन्हाळकर, सुजित तिकोडे, रुतिक वर्मा, रेशमा केवटे, अश्विनी जाधव, प्राची देवकर, जान्हवी हिरुडकर यांनी पटकावले. (vnsnews-24, sports, parbhani ) 




वसंतराव  नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतशिवारात रविवारी (दि.25) सकाळी सात वाजता सुरु झाली. विविध गटाच्या स्पर्धेतील स्पर्धकांना राज्य संघटनेचे सचिव सतिश उचिल, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे व मंगल पांडे, स्वागताध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी जय ढेंबरे यांनी हिरवी झेंडी दाखवली. 




या स्पर्धेत राज्याच्या 36 जिल्ह्यातील विविध वयोगटाचे धावपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा समावेश होता.  तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य अ‍ॅथलेटीक्स संघटनेचे सचिव सतिश उचिल, स्वागताध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधाकर खराटे, राज्य संघटनेचे वसंत गोखले, प्रलोभ कुलकर्णी, राजु पॅटी, संजय पाटील, आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.डॉ. माधव शेजुळ, सहसचिव प्रा.डॉ. गुरुदास लोकरे, स्पर्धा प्रमुख रणजीत काकडे, कैलास टेहरे, यमनाजी भाळशंकर आदी उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना पदक, सन्मानचिन्ह, ट्रॅकसुट, बॅक व शुज देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सर्व पंच, अधिकारी यांना ट्रकसुट, ट्रॅव्हल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. 





   कोल्हापुरला सांघिक विजेतेपद  

या स्पर्धेत कोल्हापुर संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कास्यपदक पटकावून सर्वसाधारण विेजेतेपद पटकावले. सातार्‍याने दोन सुवर्ण व एक रौप्य, नागपुरने एक सुवर्ण व एक रौप्य, औरंगाबाद, परभणीने प्रत्येकी एक सुवर्ण, नाशिकने एक रौप्य व दोन कास्य, अहमदनगरने प्रत्येकी एक रौप्य व कास्य पदक, नंदुरबार, रायगड व वर्धाने प्रत्येकी एक कास्य तर ठाण्याने एक रौप्यपदक पटकावले.(vnsnews-24, sports, parbhani) 








Post a Comment

0 Comments