Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ धारासुर तांडा येथील जि. प. शाळेमध्ये शिक्षकाची आत्महत्या





परभणी ➡️ जिल्हा परिषदेत शाळेमध्ये जाऊन शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्कीट खाण्यासाठी शिक्षकाने शंभर रुपये दिले. त्यानंतर वर्गखोली मध्ये जाऊन आत्महत्या केली. ही घटना 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज घडली आहे. विठ्ठल अनंत रत्नपारखे (45) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकाने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही. (vnsnews-24, crime, parbhani) 




गंगाखेड शहरात राहणारे शिक्षक विठ्ठल रत्नपारखे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी शाळा उघडल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये आले. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी 100 रुपये दिले. त्यामुळे काही विद्यार्थी बिस्किट आणण्यासाठी दुकानावर गेले. काही विद्यार्थी शाळेच्या मैदानामध्ये खेळत होते. तर पोषण आहार शिजवणारी महिला भांडी घासत होती.





यावेळी शिक्षक विठ्ठल रत्नपारखे हे वर्ग खोलीमध्ये गेले आणि त्यांनी आत मधून दार लावून घेऊन वर्गखोलीमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. बिस्किट घेऊन आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खिडकीमधून आत पाहिला असता शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी आत्महत्या केली असल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले. याची माहिती गावातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. 





घटनेची माहिती मिळताच उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र समजू शकलेले नाही. शिक्षकाने शाळेमध्येच आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. (vnsnews-24, crime, parbhani) 








Post a Comment

0 Comments