Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूर प्रेस क्लबचे विभागीय स्तरावर दर्पण पुरस्कार जाहीर




      फकिरा देशमुख.          /                बालाजी मारगुडे.     

✴️ सामाजिक वार्ता बालाजी मारगुडे बीड तर विकास वार्ता पुरस्कार फकिरा देशमुख जालना यांना जाहीर

जिंतूर ➡️ जिंतूर तालुका प्रेस क्लबच्यावतीने  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सामाजिक वार्ता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संपादक बालाजी मारगुडे बीड तर विकास वार्ता पुरस्कार फकिरा देशमुख जालना यांना जाहीर करण्यात आला. (vnsnews-24, feature, jintur) 






06 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक प्रा नामदेवराव जाधव पुणे यांचे "छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण " या विषयावर व मुंबई येथील उद्योजक अँड पंडित राठोड याचे "मी कसा घडलो" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.





या कार्यक्रमासाठी संपादक संदीपजी काळे मुंबई हेही उपस्थित राहणार आहे या व ईतर पाहुण्याच्या हस्ते या पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.




जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी जिंतूर करांसाठी साहित्यिक मेजवानीचे आयोजन केले जाते. या ही वर्षी 6 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 06 वाजता जुनी मुन्सबी, भाजी मंडी जिंतूर या ठिकाणी एका दैनिक कार्यारभ  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.






दरवर्षी तालुका प्रेस क्लबच्यावतीने मराठवाडा विभागातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या दोन पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार व आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकास वार्ता दर्पण पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी अभिमन्यू कांबळे, संतोष धारासूरकर, राजाभाऊ नगरकर, सुरज कदम, सुरेश जपंनगीरे, विठ्ठल भिसे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 





पुरस्काराचे स्वरूप रोख प्रत्येकी 05, हजार रुपये सन्मानचिन्ह, जांभेकर पगडी, पुष्पहार शाल असे आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर तालुका प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.








Post a Comment

0 Comments