Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पियर लार्निंग स्कुल मार्गदर्शिका कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न





परभणी ➡️ आज रोजी पाथरी येथे मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली *पियर लार्निंग स्कुल* मार्गदर्शिका कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) सूचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली. त्याचबरोबर निलेश शिंदे ग्यानप्रकाश फौंडेशन पुणे,सचिन भांबोरे ग्यान प्रकाश फौंडेशन सोलापूर. सर्व केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व या उपक्रमातील सर्व मुख्याध्यापक, व वर्गशिक्षक असे 76 लोक सहभागी झाले.

'पियर लार्निंग स्कुल' हा उपक्रमाची माहिती

सध्याच्या परिस्थितीचा विचार करून पाथरी तालुक्यात पायलट स्वरूपात तालुक्यातील सर्व केंद्रातील 50 विद्यार्थी संख्या असलेल्या एकूण 35 शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या गटामध्ये सध्याचा विचार करता मुलांना एकत्र करून प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नसल्याने यावर  पियर लार्निंग स्कुल हा उपक्रम एक पर्याय म्हणुन तालुक्यात सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाचे प्रमुख उद्देश  हा आहे की या उपक्रमाच्या फलनिष्पत्ती वर ही संकल्पना पूर्ण तालुक्यात राबवून प्रत्यक्ष मुलापर्यंत शिक्षण पोहोचविणे हा आहे. यासाठी हा उपक्रम प्राथमिक स्तरावर आज पासून तालुक्यामध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात येत आहे.

उपक्रमाचे उद्देश

1.सध्याच्या कोविड परिस्थिती चा विचार केला तर पुढे होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून  शेजारी व घरातली 2 ते 3 मुलांचा एक गट तयार करून गटातील या विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून शिक्षण अवगत करणे .(शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवणे.)

2.या छोट्या गटावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव स्तरावर प्रति गट एक विषय मित्र/शिक्षण प्रेमी यांची निवड करणे.

3 .कोविड काळामध्ये या उपक्रमाअंतर्गत एकही मूल शिक्षणासपासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षक व पालक समन्वय घडविणे व त्याची जबाबदारी सुनिश्चित करणे.

या प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज सदर या उपक्रमाची ओळख व दिशा देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 

या कार्यशाळेमध्ये पुढील विषय निहाय सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यात आले.

 1. *प्रास्तविक* :-तालुक्याचे सक्रिय  गटशिक्षणाधिकारी  राठोड सर यांनी करत असताना या उपक्रमाचे ध्येय उपस्थित मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांना समजावून सांगितले. शिक्षण आपल्या दारी उपक्रमाची फलनिष्पत्ती व यामधून 827 मुलांचे 100%शिक्षण मागील वर्षांमध्ये चालू राहिले यासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक केले व या उपक्रमाची नेमकेपणाने थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली

2. *पियर लार्निंग स्कुल उपक्रमाची वाटचाल व दिशा*- या मुद्याच्या अनुषंगाने सचिन भांबोरे (ग्यान प्रकाश फौंडेशन सोलापूर यांनी अत्यंत मार्मिक व सहभागी घटकला समजेल आशा पध्दतीने सादरीकरण केले.

या उपक्रमाची नेमकेपणाने अंमलबजावणी कशी केली पाहिजे यासाठी पूर्ण तयारीने PPT च्या माध्यमातून सादरीकरण करून उपस्थित सर्व सहभागी मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक यांना पियर लार्निंग स्कुल उपक्रमाची माहिती दिली गेली,या सादरीकरणामुळे सदर उपक्रमाची स्पष्टता समजून येण्यास मदत झाली.

पियर लार्निंग शाळा स्तरावर करायची म्हणजे नेमके काय केले पाहिजे,यामध्ये मुलांची सध्याची परिस्थिती, यामध्ये प्रामुख्याने उपक्रमाची अंमलबजावणी करावयाची असेल तर काय केले गेले पाहिजे,शिक्षक नियोजन व अधिकारी यांची या उपक्रमामधील भूमिका इत्यादी विषयांवर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.

3. *उपक्रमाला शुभेच्छा* :- जिल्हा शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर ह्या सदर उपक्रमाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व गटशिक्षणाधिकारी यांचे कौतुक करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोविड परिस्थितीत आशा पध्दतीने मुलांचे शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक असून हा उपक्रम जिल्ह्यासाठी दिशादर्शक होईल अशी अपेक्षा व्यक्त करून ग्यान प्रकाश फौंडेशन चे आभार या ठिकाणी व्यक्त केले.

4. *उपक्रमाचे मूल्यमापन* :-  रणदिवे सर साधन व्यक्ती यांनी या उपक्रमाचे मूल्यमापन व आढावा बैठक  सातत्याने घेतली जाणार असून यामध्ये प्रामुख्याने उपक्रमची अंमलबजावणी योग्य पध्दतीने करणे .व शाळा स्तरावर येणाऱ्या शैक्षणिक समस्या व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचे मत व्यक्त केले.

त्याचबरोबर या उपक्रमाचे मूल्यमापन जुलै अखेर प्राथमिक स्तरावर घेतला जाणार असून मागील वर्गातील मुलांच्या उजळणी वर जास्त भर देण्याचे शिक्षकांना सुचविले.

6. *शैक्षणिक वातावरण निर्मिती* :- सुशील उजगरे ग्यान प्रकाश फौंडेशन  यांनी या उपक्रमाची अंमलबजावणी प्रामुख्याने करावयाची असेल तर प्रथमता सर्व शाळांमध्ये पालक सभेच्या माध्यमातून जनजागृती व वातावरण निर्मिती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले, त्याचबरोब कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता या उपक्रमाचे नियोजन हे शाळा स्तरावर होणे आवश्यक असून समिती,ग्रामपंचायत सदस्य, व गावातील तरुण शिक्षण प्रेमी यांची निवड शाळा स्तरावर करणे आवश्यक आहे ,यामुळे सदर उपक्रम जर कोविड परिस्थिती वाढली तर या कालावधीत मध्ये मुलांचे शिक्षण थांबणार नाही व सर्व मुलं गाव स्तरावर शिकतील.यासाठी ग्रामपंचायत व समिती सदस्यांना प्राथमिक स्तरावर जबाबदारी देणे गरजेचे आहे,यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालक जनजागृती पालक सभेच्या माध्यमातून करण्यात यावी हे सांगण्यात आले.

श्री.राठोड सर गटशिक्षणाधिकारी  यांनी पुढील नियोजनामध्ये काही मुद्दे पूर्ण करण्याच्या सूचना केंदप्रमुख, मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांना दिल्या.

1.पालक सभेचे आयोजन करणे.

2. मुलांचे गट तयार करून त्या गटांना  नाव देणे.

3. जून व जुलै मध्ये उजळणी वर्ग निहाय करणे यासाठी शिक्षकांचे नियोजन शाळा स्तरावर तयार करणे.

4.शाळा व्यवस्थापन समिती च्या बैठकी मधून लोकांचा सहभाग वाढविणे व जबाबदारी सुनिश्चित करणे.

5.मुलं शैक्षणिक स्थिती मध्ये कुठे आहेत हे पडताळणीसाठी जुलै अखेर मूल्यमापन करणे.

6. *समारोप* श्री.कावळे सर यांनी  सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळा स्तरावर गट निवड करून त्या गटांना नाव देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व सर्वांचे आभार म्हणून कार्यशाळेची सांगता केली.

गटशिक्षणाधिकारी राठोड सर यांनी केंद्रप्रमुख याना सदर आजच्या बैठकीमध्ये केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे.

1. BRGपुनर्गठन करण्यासाठी सदस्यांचे नावे देणे. व केंद्र संसाधन गटाची आवश्यकतेनुसार पुनर्गठन करणे.

2. सर्व केंद्र प्रमुखांनी केंद्र स्तरीय वार्षीक नियोजन तयार करणे, यामुळे केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक स्थित मध्ये बदल घडविण्यासाठी मदत होईल.

3..सर्व केंद्र प्रमुखांनी जून महिन्याच्या शिक्षण परिषदेचे आयोजन करणे.

4.सर्व केंद्र प्रमुख यांची क्षमता व ध्येय निश्चिती करणं करण्यासाठी KP collective ही संकल्पना सुरू करत आहोत त्यामध्ये केंद्राची शैक्षणिक स्थिती मध्ये बदल करण्यासाठी केंद्रप्रमुख नेतृत्व तयार करणे.

5.शाळा व्यवस्थापन समिती च्या मासिक बैठकीचे आयोजन सर्व मुख्याध्यापकांनी करणे.






Post a Comment

0 Comments