Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

धावपळीची ड्युटी न लावण्यासाठी वाहन परिक्षकाला लाच घेताना अटक





परभणी
➡️ राज्य परिवहन महामंडळाच्या गंगाखेड आगारातील चालकाकडून 12 पैकी 5 हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी वाहन परिक्षक सूर्यकांत पांडुरंग दहिफळे याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने गुरुवारी (दि.24जून) ताब्यात घेतले.

या आगारातील एका चालकास तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे ते जवळपास एक वर्ष आजारी होती. दीड वर्षानंतर ते कर्तव्यावर हजर झाले तेंव्हा आगार व्यवस्थापक किशन कर्‍हाळे यांची भेट घेतली. आपणास धावपळीची ड्युटी न लावण्याची विनंती केली, तेव्हा कर्‍हाळे यांनी पैशाची मागणी केली व वाहन परिक्षक दहिफळे यांना भेटा असा सल्ला दिला. दहिफळे यांनी या भेटीतून व्यवस्थापक व आपणास दरमहा तीन हजार रुपये द्या, असा सल्ला दिला. या चालकाने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे या अनुषंगाने तक्रार दाखल केली. पथकाने तात्काळ पंचासमक्ष कारवाई केली. तेव्हा तक्रारकर्त्याकडून चालकाची ड्युटी लावण्याऐवजी डिझेल पंपावर ड्युटी करीता परिक्षक दहिफळे यांनी 12 हजार रुपयांची लाच मागितली. गुरुवारी (दि.24) रचलेल्या सापळ्यात त्यापैकी 5 हजार रुपयांचा पहिला हफ्ता पंचासमक्ष स्वीकारतेवळी पथकाने दहिफळे यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक भरत हुंबे, कटारे, चट्टे, धबडगे, हनुमंते, मुखीद, कुलकर्णी, दंडवते, टेहरे, कदम, हबीब यांच्या पथकाने ही कारवाई केली.




Post a Comment

0 Comments