Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरात तीन दिवस पाणीपुरवठा खंडित





परभणी
➡️ परभणी शहराला येलदरी येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य रायझिंग जलवाहीनी बोरी ता.जिंतुर येथे महामार्गाच्या कामादरम्याण गुरुवारी (दि.24) फुटल्याने शहरात दि.25 ते 27 जून दरम्याण पाणीपुरवठा होणार नसल्याची माहीती शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली आहे.

परभणी शहराला येलदरी धरणातून पाणी पुरवठा केला जातो.त्यासाठी जिंतुर ते परभणी जवळील जलशुध्दीकरण केंद्र अशी मोठी जलवाहीनी आहे.सध्या परभणी ते जिंतुर महामार्गाचे काम सुरु असून या कामादरम्याण खोदकाम करताना जेसीबीमुळे बोरी गावाजवळ मुख्य जलनाहीनी फुटली आहे.त्यामुळे जलनाहनी दुरुस्तीचे काम तातडीने महापालीकेने हाती घेतले असून दुरुस्त होईपर्यंत परभणी शहरातील प्रभाग समिती अ,प्रभाग समिती ब अंतर्गत पाणीपुरवठा पूर्णतहा तिन दिवस खंडीत होणार आहे.तर प्रभाग समिती क अंतर्गत काही भागांचा अशंत: पाणीपुरवठा खंडीत होणार आहे.याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शहस अभिय़ंता वसीम पठाण यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments