Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन






मुंबई ➡️ ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री  ह्रदयविकाराच्या झटक्याने खासगी रूग्णालयात निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आपल्या दमदार अभिनयामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. अंगबाई सासूबाई या टीव्ही मालिकेत अभिनय करताना ते छोट्या पडद्यावर शेवटचे दिसले. त्यांच्या पश्चात पत्नी नीता, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

रवी पटवर्धन यांचा जन्म 06 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा 'पाटील', 'पोलीस आयुक्त', 'न्यायाधीश' किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि 200 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. बालगंधर्व हे 1944  साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते.

रवी पटवर्धन यांनी केवळ चित्रपट नव्हे तर अनेक नाटकांमधून अभिनय केला. खरे तर रवी पटवर्धन हे पहिल्यांदा नाट्यअभिनेते होते. त्यानंतर ते चित्रपट अभिनेते होते. अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा 'पाटील', 'पोलीस आयुक्त', 'न्यायाधीश' किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या. त्यांनी जवळपास 150 पेक्षा अधिक नाटकं आणि जवळपास 200 चित्रपटांतून भूमिका साकारल्या.




Post a Comment

0 Comments