Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ज्येष्ठ नागरिकाच्या 40 हजार रुपयांवर चोरांनी मारला डल्ला





परभणी ➡️ बसमध्ये चढताना ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील 40 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची घटना शनिवारी (दि.पाच) सायंकाळी परभणी बसस्थानकात घडली. या प्रकरणी सोमवारी (दि.सात) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरी (ता.जिंतूर) येथील मजुरीचे काम करणारे नरहरी देवराव चवरे हे सुनेच्या डिलीव्हरीसाठी आले होते. सिजर होईल म्हणून त्यांनी मोठी रक्कम सोबत आणली होती. नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने ते शनिवारी (दि.पाच) सायंकाळी बोरीकडे जाण्यासाठी परभणी बसस्थानकावर आले. मात्र, बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्याजवळील 40 हजार रुपयांवर डल्ला मारला. पैसे चोरी गेल्याचे समजताच त्यांनी ही बाब कुटूंबियांना सांगितली. सोमवारी ते परभणीत दाखल झाले. कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने खिश्यातील 40 हजार रुपये चोरल्याचे नमूद केले आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी कोलमवाड हे करीत आहेत.




Post a Comment

0 Comments