Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  बोअरमधून चार वर्षीय सोहम बाहेर काढण्यात आले यश; बचाव पथकांची कार्यवाही





परभणी - उक्कलगाव शिवारातील एका शेतातील उघड्या बोअरमध्ये पडलेल्या सोहम सुरेश उक्कलकर या चार वर्षीय चिमूकल्यास बचाव पथकांनी बुधवारी 6 तास प्रयत्न करीत सुखरुपपणे बोअरच्या बाहेर काढले.(vnsnews24, feature ) 




या चिमूकल्यास बाहेर काढण्याकरीता नांदेड येथून एनडीआरएफचे बचाव पथक बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता दाखल झाले होते. या पथकाने  महसूल, पोलिस व अग्निशामक दल व आरोग्य विभागाच्या सहाय्याने जोरदार मोहिम हाती घेतली. विशेषतः बोअरमध्ये तो चिमूकला नेमका किती फुट खोल पर्यंत अडकला आहे. या गोष्टीचा अंदाज घेवून बोअरच्या बाजूने खोदकाम सुरु केले. 





त्या पाठोपाठ बोअरमध्येसुध्दा त्या चिमूकल्याशी कुटूंबियांद्वारे संपर्क साधला. तत्पूर्वी त्या चिमूकल्यासाठी ऑक्सीजनसुध्दा पुरविण्यात आला. या बचाव पथकाने बोअरमध्ये दोरीच्या सहाय्याने त्या चिमूकल्याच्या हातांना फासे टाकले. त्या दोरीद्वारे हळूवारपणे चिमूकल्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. दोरीचे सहाय्यक मिळाल्याने चिमूकल्यानेसुध्दा बोअरच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. अन् हे सारे प्रयत्न यशस्वी ठरले. तब्बल सहा तासानंतर सोहम सुखरुपपणे बाहेर पडला तेव्हा कुटूंबियांसह बचाव पथकासह अधिकारी-कर्मचार्‍यांचे आनंदाश्रुंनी डोळे पाणावले. कुटूंबियांनी त्यास घट्ट मीठी मारली.




मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारातील सर्वे नंबर 96 मध्ये सुनील दगडू यांचे शेत आहे. ते शेत उक्कलगावकर कुटूंबिय पाहत आले आहेत. नेहमीप्रमाणे या कुटूंबियातील काही सदस्य शेतावर कामानिमित्त गेले. त्यावेळी आज्जी-आजोबांबरोबर सोहम सुरेश उक्कलकर हा चार वर्षीय चिमूकला शेतावर गेला होता. त्यावेळी शेतात त्यांचे कुटूंबिय व अन्य व्यक्ती कामात व्यस्त असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारास सोहम हा चार वर्षीय मुलगा खेळता-खेळात शेतातील उघड्या बोरमध्ये पडला. कुटूंबियांना तात्काळ तो प्रकार निदर्शनास आला. तात्काळ त्यातील काहींनी मोठी आरडाओरड केल्याबरोबर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. काहींनी तो प्रकार पोलिस व महसूल प्रशासनास कळविला होता.





या पाठोपाठ उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ, तसीलदार पल्लीव टेमकर, पोलिस निरीक्षक दिपक दंतूलवार, मुख्याधिकारी कोमल सावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार झाडगावकर, मंडळ अधिकारी जगन्नाथ बिडवे आदी कर्मचार्‍यांसह धावून गेले व मशनरी बोलावून या पथकाने बोअरमध्ये अडकलेल्या त्या चिमूकल्यास बाहेर काढण्याकरीता युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केले होते.







Post a Comment

0 Comments