Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ श्री शिवाजी महाविद्यालयात 'माझी माती माझा देश' अभियानाची सुरुवात




परभणी - केंद्र आणि राज्यशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'माझी माती माझा देश' या  अभियानाची सुरुवात बुधवार (दि.9) रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.(vnsnews24, feature ) 



यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. तुकाराम  फिसफिसे, डॉ.एस.एल.राठोड,डॉ. रामदास टेकाळे, प्रबंधक विजय मोरे, प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी तसेच रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




अभियानांतर्गत देशाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असा या अभियाना मागचा उद्देश आहे. भारताची यशोगाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे अभियान महाविद्यालय स्तरावर यशस्वीपणे राबविण्यात यावे असे निर्देश भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहेत.त्या अनुषंगानेच ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या उपक्रमाची आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार आहे. यात सैन्य दलाची शौर्यगाथाचे भितीपत्रक,रासेयोने दत्तक घेतलेल्या गावात  वृक्षारोपण, निबंध स्पर्धा,देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.







Post a Comment

0 Comments