Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिप केंद्रिय कन्या शाळा चारठाणाच्या विद्यार्थ्यांनी घेतली विविध क्षेत्रांची घेतली भेट





जिंतूर - शालेय जीवनात विद्यार्थी अनेक गोष्टी ह्या निसर्गाकडून शिकत असतात याचाच एक भाग म्हणून आज जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जिल्हा परिषद केंद्रिय कन्या शाळाच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र भेट उपक्रम आयोजित करण्यात आली. (vnsnews24, feature ) 





कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी चारठाणा नगरीतील विविध ऐतिहासिक वास्तुंना भेट देऊन क्षेत्र भेट अनुभव व आनंद घेतला सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गोकुळेश्र्वर महादेव मंदिर व परीसारातील बारवला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर काशिविश्र्वेश्र्वर मंदिर व गणेश मंदिर, तसेच ऐतिहासिक दीपस्तंभ ला भेट देऊन माहिती संकलित केली. त्यानंतर नदीकाठी वसलेल्या हेमाडपंथी मंदिर येथे वनभोजन केले. नंतर थोडी विश्रांती घेऊन सावता मंदिर येथील सभागृहात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वर्ग चौथी ते सातवीच्या मुलांनी, मुलींनी भाग घेतला होता. 



विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ शिक्षक नारायण गडदे यांनी गीत गायन केले. शेवटी शाळेत जाऊन समारोप करण्यात आला. नारायण गडदे, ज्ञानेश्वर ननुरे, प्रशांत चौधरी, रामराव देशमुख, इंदू उलिगडे, सरस्वती फोले , संगीता केंद्रे, विद्युलत्ता कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. एकंदरीत आज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या माध्यमातुन माहिती मिळवली व आजच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.








Post a Comment

0 Comments