Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  मुदगल येथील कोयताच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी; तीन आरोपींचा समावेश





परभणी - पाथरी तालुक्यातील मुदगल या गावी तीन युवकांनी कोयत्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात चंद्रमुनी मल्हारी घोडके नामक युवक गंभीर जखमी झाला. आज बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (vnsnews24, feature ) 



या गावातीलच काहींनी वडीलांना शिवीगाळ केली म्हणून संबंधित युवकाने जाब विचारला, त्यावेळी समोरच्या तीघा युवकांनी कोयत्याने वार केला. त्यात चंद्रमुनी घोडके हे गंभीर जखमी झाले. 





प्रत्यक्षदर्शनींनी त्यांना तात्काळ पाथरीच्या शासकीय रुग्णालयात तेथून परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.








Post a Comment

0 Comments