Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटक





जिंतूर- तालुक्यातील पांढरगळा गावात एका 17 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचारासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अ‍ॅॅॅट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vnsnews24, feature ) 



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरगळा तहसील येथे राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असताना 10 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 2.30 वाजेच्या दरम्यान गावातील आदिनाथ कवडे याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. 



त्यानंतर पीडित मुलीला धमकावत याविषयी कोणाला काही सांगितल्यास तुझी व तुझ्या कुटुंबियांची बदनामी करीन, असे सांगितले अशी धमकी दिली. या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीची नोंद होताच जिंतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आदिनाथ कवडे याला अटक केली.



     




Post a Comment

0 Comments