Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील डॅमेज कंट्रोलचे काम करतोय - डॉ. तानाजी सावंत






परभणी ➡️ राज्यातील आरोग्य विभागाची अवस्था खूपच वाईट असून पीएचसी पासून जिल्हा रूग्णालयांपर्यंतचे रूप हे बदलण्याची गरज आहे. हे गेल्या 17-18 वर्षात आरोग्याकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम असून सद्यस्थितीत  30 टक्के आस्थापनेवरच यंत्रणेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलचे काम आपण हाती घेवून अधिकाधिक चांगल्या योजनांच्या माध्यमातून  आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या 8 महिन्यात 14 महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी परभणीत सांगितले.





शुक्रवारी (दि. 26) दुपारी 100 खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मॉड्युलर आयसीयु कॉम्प्लेक्सची पाहणी करून त्यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे उपस्थिती होती.



100 खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे लोकार्पण



परभणी येथे 100 खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे लोकार्पण व दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., सीईओ रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, आरोग्य उपसंचालक डॉ.मुंढे,  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते, अतिरिक्त  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुनिता यादव, स्त्री रूग्णालय अधीक्षक डॉ.कालिदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  





राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., सीईओ रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, आरोग्य उपसंचालक डॉ.महानंदा मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते, अतिरिक्त  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुनिता यादव, स्त्री रूग्णालय अधीक्षक डॉ.कालिदास चौधरी, डॉ.किशोर सुरवसे, डॉ.राम रोडगे,  राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपअभियंता शेख अंजुम अख्तर, गजानन पवार, राजेभाउ गरूड आदी मान्यवर उपस्थित होते. 




आपल्या भाषणात पालकमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार हातात हात घालून काम करत आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचे अनुदान दीड लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवले. पंतप्रधान आरोग्यदायी योजनेतून स्वतंत्र पाच लाख मिळतात. दहा लाख रूपयांत कुठल्याही आजारावर शासनाकडून मोफत उपचार मिळू शकतात, याचा पात्र गरजूंनी लाभ घ्यावा. राज्य सरकारमधील  34 खात्यांपैकी एकही खातं आरोग्य विभागाइतक्या गतीने काम करीत नसल्याचा दावादेखील डॉ.सावंत यांनी केला. राज्यातील कंत्राटी परिचारिकांना सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव दिलेला असून त्यासाठी निश्चितपणे विशेष प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.





खा.जाधव यांनी नव्याने  मंजूर 50 बेडचे हॉस्पिटल स्त्री रूग्णालयाच्या इामरतीत किंवा आयटीआयच्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ झाले तर सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य विभागातील रिक्त जागा भराव्यात, राज्यातील 3 हजार कंत्राटी परिचारिकांना सेवेत कायम करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ कार्यान्वित होण्यासाठी पालकमंत्री म्हणून पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ.सावंत यांच्यांकडे केली.  




परभणीकरांना मागितल्याशिवाय किंवा भांडल्याशिवाय काहीच मिळालेले नाही. आ.डॉ.राहुल पाटील यांचे 150 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याचे सांगत तिकडे केवळ पैसेवाले शिकू शकतील. परंतू गरजू  व गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचीच नितांत गरज असल्याचे खा.जाधव यांनी स्पर्ष्ट केले. एकदा कमिटीने भेट दिली, त्यावेळी काढलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून आता कुठलीही उणीव राहिलेली नाही. केवळ आता  आरोग्यमंत्री व पालकमंत्री या नात्याने तुमच्या पाठबळाची गरज असल्याचे  डॉ.सावंत यांना ते म्हणाले. 




आ.बोर्डीकर यांनी 2006 मध्ये मान्यता मिळालेल्या स्त्री रूग्णालयाची पुर्वीची इमारत डोळ्यांच्या रूग्णालयास देण्यात आली. राज्यात सत्तेवर आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाची गती चांगली असल्यानेच हे रूग्णालय पुर्णत्वास गेल्याचे त्या म्हणाल्या. आता कुठल्याच आरोग्य सुविधा कमी पडणार नाहीत, याकडे पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी गोयल यांनी केले. त्या म्हणाल्या की, माता व बाल मृत्यूंचे प्रमाण करण्यासाठी शासनाने 2013-14 मध्ये मंजूर केलेल्या स्त्री रूग्णालयाच्या कामाला प्रत्यक्षात 2019 ला सुरूवात झाली. वाढीव निधीही मिळाला. डीपीडीसीतून 5 कोटी  आणि स्टेट एनएचएम मधून 5 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या आरोग्यासाठी  अत्यंत महत्वाचे ठरणारे 100 खाटांंचे स्त्री रूग्णालय साकारले आहे. सुत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले.




परभणी येथे 100 खाटांच्या स्त्री रुग्णालय व डीईआयसी इमारतीचे लोकार्पण व दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., सीईओ रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, आरोग्य उपसंचालक डॉ.मुंढे,  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते, अतिरिक्त  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुनिता यादव, स्त्री रूग्णालय अधीक्षक डॉ.कालिदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  





Post a Comment

0 Comments