Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पालकमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध





परभणी ➡️ जिल्ह्यात आज शुक्रवारी आठ महिन्याने पालक मंत्री येणार म्हणून त्यांच्या दौऱ्याला काही गालबोट लागू नये यासाठी विशेष दक्षता घेत पोलिस प्रशासनाकडून गुरुवारी संध्याकाळपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन कलम १४९ च्या नोटीस बजावण्यात आल्या.  (vnsnews24, feature ) 






आज शुक्रवारी सकाळी ८  वाजता स्वाभिमानीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या मागावर पोलीस होते. ठरल्या प्रमाणे सकाळी १० वाजता  स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयावर सर्व पदाधिकारी जमले असता मोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी सर्व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन मोंढा पोलीस ठाण्यात नेत अटक करून स्थानबद्ध केले. 




यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,भास्कर खटिंग, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजभाऊ लोडे, माऊली शिंदे, उद्धव जवंजाळ, मोकिंद वावरे, बाळासाहेब ढगे यांच्यासह कार्यकर्ते होते.







Post a Comment

0 Comments