Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ मनपा प्रशासनाने हटविले शहरातील लहान-मोठ्या 47 अतिक्रमण





परभणी ➡️ शहर महानगरपालिकेमार्फत जिंतूर रोड महावितरण कार्यालयाच्या बाजूने  अमरधाम स्मशानभूमी रोड स्त्री रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील लहान-मोठे 47 अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.(vnsnews24, feature ) 





परभणी शहरातील जिंतूर रोड महावितरण कार्यालयाच्या बाजूने अमरधाम स्मशानभूमी रोड, स्त्री रुग्णालय पर्यंतच्या परिसरातील वाहतुकीसाठी असलेल्या बारा मीटर रुंद रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई अतिरिक्त आयुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या नियंत्रणात आज मंगळवारी (दि.31) अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली.



या मोहिमेमध्ये 12 मीटरच्या रस्त्यावर 2 ते 10 फुट अतिक्रमण करून बांधण्यात आलेली कच्च्या पक्क्या स्वरूपातील 47 अतिक्रमित बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. 



या मोहिमेध्ये  सहाय्यक संचालक नगररचना किरण फुटाणे, शहर अभियंता वसीम पठाण, सहायक आयुक्त आवेज हाश्मी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करूण गायकवाड, शाखा अभियंता राहुल धुतडे, रिजवान पठाण, हेमंत दापकेकर, दिनेश भंडे, कनिष्ठ अभियंता बालाजी सोनवणे, प्रवीण हाटकर, संतोष लोंढे, पंकज देशमुख, पवन देशमुख, मीर अल्मतश यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सहभागी होते. 


अनेक नागरिकांनी दिलेल्या वेळेत स्वत:हून अतिक्रमणे काढून सहकार्य केले. अशा प्रकारे शहरातील अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.







Post a Comment

0 Comments