Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नवीन सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय शाखेची निर्मिती करा - भा. ज. युवा मोर्चा ची मागणी




जिल्हा प्रशासन मार्फत महसूल मंत्री यांच्याकडे  निवेदन

परभणी ➡️ परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे व येथे दस्त नोंदणी संख्या भरपूर आहे त्यामुळे शासनास दस्त नोंदणी द्वारे भरपूर महसूल मिळते. तसेच शासनास भरपूर महसूल मिळवून देणारा हा विभाग आहे. येथे येणारा प्रत्येक पक्षकार शासनास महसूल भरतो त्यानुसार इमारत व इतर सोयी सुविधा या विभागास कमी प्रमाणात आहेत तसेच आता शहरालगतचे बरेचसे रस्ते चांगले झाले आहेत.शिवाय रिंग रोडचे कामही प्रगतीपथावर आहे या सर्व बाबींमुळे शहरात जमीन खरेदी विक्रीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे व पुढेही होतच राहणार आहे.




या सर्व बाबी लक्षात घेता जास्त नोंदणीसाठी जनतेस योग्य सेवा मिळावी याकरिता सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयच्या दुसर्‍या शाखेची स्थापना करावी ह्या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा, परभणी महानगरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष रामदास पवार भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय डहाळे,दिलीप रिक्षे आदींची उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments